कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर येणार एकत्र; पण कुणी घडवला समेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 13:38 IST2018-11-13T13:36:55+5:302018-11-13T13:38:37+5:30
होय, कपिल व सुनीलमध्ये समेट झाला आहे आणि टेलिव्हिजनवरची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास तयार आहे.

कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर येणार एकत्र; पण कुणी घडवला समेट?
कॉमेडियन कपिल शर्माचे चाहते त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’कडे डोळे लावून बसले आहेत. या शोमध्ये कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा एकत्र दिसणार, अशी चर्चा होती. या चर्चेनंतर चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली होती. ताजी बातमी खरी मानाल तर, ही चर्चा एकदम खरी आहे. होय, कपिल व सुनीलमध्ये समेट झाला आहे आणि टेलिव्हिजनवरची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास तयार आहे. आता हा चमत्कार झाला तरी कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सलमान खानमुळे. होय, बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने ही करामत घडवून आणली आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमाननेच कपिल व सुनील यांच्यात समेट घडवून आणला. भाईजानने दोघांशीही चर्चा केली आणि त्यांना मागचे सगळे विसरून एकत्र येण्यासाठी राजी केले.
आता कपिल व सुनीलचा समेट घडवून आणण्यात सलमानला इतका इंटरेस्ट का,असाही प्रश्न अनेकांना पडेल. तर यामागचे कारण म्हणजे,कपिलचा शो आता सलमान खानचे प्रॉडक्शन हाऊस प्रोड्यूस करतोय. कपिलच्या शोमध्ये पैसे ओतायचे तर तो हिट होणेही आवश्यक आहे आणि यासाठी कपिल व सुनील एकत्र येणे किती आवश्यक आहे, हे सलमान जाणून आहे. त्यामुळे सलमानने दोघांनाही एकत्र येण्यास भाग पाडले. तसेही भाईजानचा शब्द कोण मोडणार?
तुम्हाला ठाऊक आहेच की, विमानातील भांडणानंतर सुनीलने कपिलच्या शोमधून अंग काढून घेतले होते. आता मात्र भाईजानमुळे का होईना कपिलच्या शोमध्ये तो परतणार आहे. चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी होऊ शकते...