Kapil Sharma Wedding: कपिल-गिन्नीचे लग्न आज! लाईव्ह पाहू शकणार चाहते!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 10:20 AM2018-12-12T10:20:20+5:302018-12-12T10:21:27+5:30
कॉमेडियन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ आज १२ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. कपिलचे मनोरंजन विश्वातील जवळचे मित्रही या लग्नात सामील होण्यासाठी पंजाबला पोहोचले आहेत.
कॉमेडियन कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ आज १२ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. कपिलचे मनोरंजन विश्वातील जवळचे मित्रही या लग्नात सामील होण्यासाठी पंजाबला पोहोचले आहेत. कॉमेडियन भारती सिंग,कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, राजीव ठाकूर, गायिका ऋचा शर्मा असे सगळे या लग्नात सामील होत आहेत. ‘द कपिल शर्मा’शोची संपूर्ण टीम या लग्नाला हजर आहे.
काल रात्री ‘माता की चौकी’ कार्यक्रमात कपिल व त्याच्या मित्रांनी धम्माल केली. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कपिल शर्माच्या आईचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी ऋचा शर्माच्या गाण्यावर ताल धरलेला दिसत आहेत.
कॉमेडियन भारती सिंग ही सुद्धा कपिलच्या लग्नात हजर आहे. प्राप्त माहितीनुसार, कपिल शर्मा हाही दोन पद्धतीने लग्न करणार असल्याची खबर आहे. १२ डिसेंबरला तो हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे. तर १३ डिसेंबरला पंजाबी पद्धतीने. अर्थात अद्याप या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
चाहते कपिल शर्माचे लग्न लाईव्ह पाहू शकतील, असे म्हटले जात आहे. हे लग्न कपिल शर्मा K9 नामक युट्यूब चॅनलवर लाईव्ह दिसेल, असे कळतेय.अर्थात ते वेळ आल्यानंतरच कळेल.
लग्नानंतर अमृतसर येथे येत्या १४ डिसेंबरला कपिलच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होणार आहे. यात त्याचे नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी होती. यानंतर याच महिन्यात २४ तारेखला मुंबईत एक ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. यात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज हजर राहतील.
गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा. गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार आहे.