कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 06:00 AM2020-11-19T06:00:00+5:302020-11-19T06:00:00+5:30

छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्माने सिनेमात एंट्री केली होती. मात्र सिनेमात त्याला फारसे यश मिळाले नाही. आता कपिल शर्माने आपला मोर्च डिजीटील क्षेत्राकडे वळवला आहे.

Kapil Sharma weighs 11 kg less, fans also give comments after seeing the transformation | कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस

कपिल शर्मा ने 11 किलो वजन केले कमी, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही देतायेत कमेंटसवर कमेंटस

googlenewsNext


 स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब कॉमेडी किंग कपिल शर्मानेही भलतीच मनावर घेतलेली दिसतेय. एरव्ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा कपिल शर्मा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कपिलचा बदललेला लूक पाहून चाहतेही थोडे आश्चर्य व्यक्त करत आहे.रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल आणि इतकेच नाहीतर कमी झालेले वज सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे. स्वत:ला खूप चांगले फिट ठेवण्यासाठी तो वर्कआऊट करत असून योग्य आहारही घेतो. 

 

कपिलचे नवीन फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की. उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या कपिलने या वर्षात काही तरी वेगळं करण्याचं ठरवलेलं दिसतंय.मात्र त्यासाठी त्याच्या फॅन्सना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असून या क्षेत्रात स्टायलिश दिसण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच कपिल शर्मा सध्या त्याच्या लूकवर बरीच मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय. त्याचा नवीन लूकही चाहत्यांना पसंत पडला आहे. त्याच्या या फोटोंवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटस येत असल्याचे पाहायला मिळतंय.

छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्माने सिनेमात एंट्री केली होती. मात्र सिनेमात त्याला फारसे यश मिळाले नाही. आता कपिल शर्माने आपला मोर्च डिजीटील क्षेत्राकडे वळवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा लवकरच एका वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करणार आहे. मात्र कपिलच्या या प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

कृष्णा अभिषेकने मस्करीत म्हटले की, कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करण्यासाठी २० कोटी रुपये मानधन घेतो आहे. मात्र असेही म्हटलं जात आहे की हे सगळं कृष्णाने मस्करीत म्हटले होते. मात्र हे ऐकून चाहते खूप हैराण झाले आहेत. मात्र ही बाब नाकारता येत नाही की कपिल शर्माने डिजिटल प्रोजेक्टसाठी जास्त मानधन घेतले असेल. 'द कपिल शर्मा' शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Kapil Sharma weighs 11 kg less, fans also give comments after seeing the transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.