कपिल शर्मा या दिवशी चढणार बोहल्यावर, वाचा, Inside Details !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 02:54 PM2018-11-15T14:54:15+5:302018-11-15T16:12:26+5:30

दीपिका पादुकोणला कपिल शर्माने आपल्या खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण आता लवकरच दीपिका कपिलला शुभेच्छा देताना दिसणार आहे. होय, कारण कपिल शर्मा लवकरचं लग्न करतोय आणि या लग्नाची डेटही फायनल झाली आहे.

Kapil Sharma's Wedding: Everything You Should Know About Date & Ceremony | कपिल शर्मा या दिवशी चढणार बोहल्यावर, वाचा, Inside Details !!

कपिल शर्मा या दिवशी चढणार बोहल्यावर, वाचा, Inside Details !!

googlenewsNext
ठळक मुद्देकपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार. या पंजाबी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

दीपिका पादुकोणला कपिल शर्माने आपल्या खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण आता लवकरच दीपिका कपिलला शुभेच्छा देताना दिसणार आहे. होय, कारण कपिल शर्मा लवकरचं लग्न करतोय आणि या लग्नाची डेटही फायनल झाली आहे. ताजी बातमी मानाल तर येत्या १२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार. या पंजाबी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अद्याप कपिलने लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या लग्नासाठी १२ डिसेंबरचा मुहूर्त पक्का असल्याचे कळतेय. पंजाबी रितीरिवाजानुसार हे लग्न होणार आहे.

येत्या १० तारखेपासून या लग्नाचे विधी सुरू होतील. सर्वप्रथम १० तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी ‘माता का जागरण’ आहे. यानंतर दुसऱ्यादिवशी संगीत आणि यानंतर मेहंदी होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही कळतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.
गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.
गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार असल्याचीही खबर आहे.

Web Title: Kapil Sharma's Wedding: Everything You Should Know About Date & Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.