अशी ही बनवाबनवी..! प्रसिद्ध अभिनेत्यानं नकली घड्याळ विकलं चक्क ७ लाखांना, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:40 IST2023-08-03T16:39:13+5:302023-08-03T16:40:57+5:30
आपलं घड्याळ ब्रॅण्डेड असल्याचं सांगत अभिनेत्याने चक्क ते 7 लाखांना विकलं.

अशी ही बनवाबनवी..! प्रसिद्ध अभिनेत्यानं नकली घड्याळ विकलं चक्क ७ लाखांना, गुन्हा दाखल
कसम से आणि काहे ना काहे यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला करण हुक्कू अडचणीत सापडला आहे. आपलं घड्याळ ब्रॅण्डेड असल्याचं सांगत 7 लाखांना विकलं. ज्यावेळी ते घड्याळ त्या ब्रॅण्डचं नाही हे लक्षात आलं तेव्हा निर्मात्याने पोलीस ठाण्यात अभिनेत्यावर विरोधात तक्रार दाखल केली.
५३ वर्षीय अभिनेता करण हुक्कू सध्या त्याच्या कथित फसवणुकीमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याने लक्झरी घड्याळाची फर्स्ट कॉपी एका चित्रपट निर्मात्याला विकली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अभिनेत्याने या प्रकरणावर मौन बळगलं असून यावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण आणि निर्माता मोहम्मद सलीम अब्दुल कुद्दूस फारुकी यांची भेट २०१६ मध्ये जिममध्ये झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "फारुकीने हुक्कूकडून सोन्याची अंगठीही खरेदी केली आणि त्या खरेदीवर तो खूश झाला. पुन्हा चित्रपट निर्माता मोहम्मद यांनी घड्याळ घेतलं मात्र त्यामध्ये फसवणूक झाल्याचं सांगितलं.
निर्मात्याने त्याच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे, "मी त्याच्याकडून 7 लाख रुपयांना एक ब्रॅण्डेड घड्याळ विकत घेतले. मी ते घड्याळ घरी ठेवले आणि नंतर ते विकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी ते विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला कळले की ते डुप्लिकेट आहे. आपली फसवणूक झाल्याचं समजल्यावर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं. या प्रकरणी अभिनेता करण हुक्कूवर ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
करण हुक्कू क्या लव्ह स्टोरी है (2007) आणि ट्रिक (2013) तसेच सजदा तेरे प्यार में, तेरा मुझे है पहले का नाता कोई आणि घर की लक्ष्मी बेटियांसह टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे.