करण जोहरने इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये दिली ही कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 07:34 AM2018-01-19T07:34:46+5:302018-01-19T13:04:46+5:30
करण जोहरने दिग्दर्शक म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ...
क ण जोहरने दिग्दर्शक म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर आजवर करणने कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर कल हो ना हो, दोस्ताना, ये जवानी है दिवानी, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, बद्रिनाथ की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. करण जोहरने आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. करण आज बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध सेलिब्रेटींपैकी एक मानला जातो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, करण हॉटेलमधील शॅम्पू चोरतो. त्यानेच ही गोष्ट इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात नुकतीच सांगितली.
इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्सच्या आगामी भागामध्ये सगळे परीक्षक 'हॅव यू डन धिस?’ असा एक रोचक खेळ खेळणार आहे आणि त्यातूनच करण जोहरची अनेक गुपिते बाहेर पडणार आहेत. याच खेळाच्या दरम्यान करणाला विचारण्यात आले की, टूथपेस्ट बाहेर काढण्यासाठी त्याने कधी लाटण्याचा वापर केला आहे का? तेव्हा त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले आणि तो म्हणाला की, मी असे केले नसले तरी मला तसे करून पाहायला नक्कीच आवडेल. तेव्हा सूत्रधार रित्विक धनजानीने या फिल्ममेकरला सर्वांसमोर ट्यूबमधून टूथपेस्ट बाहेर काढायला लावली. हे सगळे झाल्यानंतर करण जोहरने जो किस्सा सांगितला ते ऐकून सगळेच चकित झाले. करण कधीकधी हॉटेल्समधून शॅम्पू चोरतो अशी कबुली त्याने इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात दिली. त्याने सांगितले, मी माझ्या केसांसाठी भरपूर शॅम्पू वापरतो. त्यामुळे मला खूप जास्त शॅम्पू लागतो. त्यामुळे मी अनेकदा हॉटेल्समधून शॅम्पू चोरला आहे आणि हॉटेलमध्ये मिळणाऱ्या या शॅम्पूंचा वास खूपच छान येतो असे मला वाटते.
Also Read : करण जोहरच्या 'त्या' ट्वीटमुळे त्याला मागवी लागली माफी