PROMO : उघड्यावर शौचास बसलो, मागे वळून पाहिलं तर..., करण जोहरने सांगितला लाजीरवाणा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:06 PM2022-02-11T16:06:35+5:302022-02-11T16:08:22+5:30

karan johar : करण जोहरने ‘हुनरबाज’च्या सेटवर ‘कभी खुशी कभी गम’च्या शूटिंगचा एक असा काही मजेशीर किस्सा ऐकवला की, हसून-हसून सगळ्यांचं पोट दुखू लागलं...

karan johar shares story of suraj hua madham song when he felt embarrassed | PROMO : उघड्यावर शौचास बसलो, मागे वळून पाहिलं तर..., करण जोहरने सांगितला लाजीरवाणा किस्सा

PROMO : उघड्यावर शौचास बसलो, मागे वळून पाहिलं तर..., करण जोहरने सांगितला लाजीरवाणा किस्सा

googlenewsNext

दिग्दर्शक करण जोहर ( karan johar) सध्या ‘हुनरबाज’ हा रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसतोय. परिणीती चोप्रा आणि मिथुन चक्रवर्ती हेही त्याच्यासोबत आहेत. पण करण म्हटल्यावर ‘हुनरबाज’च्या सेटवर धम्माल मस्ती सुरू असते. अलीकडे करणने असा काही मजेशीर किस्सा ऐकवला की, हसून हसून सगळ्यांचं पोट दुखू लागलं. तूर्तास  त्याचा प्रोमो तुम्ही पाहू शकता. या प्रोमोत करण ‘कभी खुशी कभी गम’च्या (Kabhi Khushi Kabhie Gham) सेटवरचा धम्माल किस्सा सांगताना दिसतोय.

प्रोमोच्या सुरुवातीला परिणीती ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाची धून गुणगुणताना दिसते. त्यानंतर करण या चित्रपटाच्या शूटिंगचा एक मजेशीर किस्सा सांगू लागतो.

तो सांगतो, ‘आम्ही इजिप्तमध्ये कभी खुशी कभी गम या चित्रपटाचं शूटिंग करत होतो. शाहरूख व काजोलसोबत सूरज हुआ मध्यम या गाण्याचं शूटींग होतं. येथे एक असं लोकेशन होतं,  जिथे 100-100 किलोमीटर लांबपर्यंत फक्त लाइमस्टोन  होते. तिथे फक्त आम्ही होतो, अन्य कुणीही नाही. जणू हाच स्वर्ग आहे, इतकं सुंदर लोकेशन होतं.  सगळीकडे नुसती पांढरी रेती, पांढरे लाइनस्टोन स्ट्रक्चर. त्याच दिवशी सकाळी माझं पोट खराब झालं होतं आणि मला लूज मोशन सुरु झालं होतं. कुठे ना तंबू होता, ना बाथरुम.  आता काय करू? असा प्रश्न पडला असताना एका मोठ्या लाइमस्टोनच्या मागे जाऊन उरकायचं, असा विचार केला. कारण मी थांबू शकत नव्हतो.  मी एका लाईमस्टोन स्ट्रक्चरमागे गेलो, सुरुवात केली. अचानक मागून मला थोडा आवाज आला.  मी वळून पाहिलं तर हॉलिवूडचं एक क्रू त्याच ठिकाणी लोकेश शोधण्यासाठी आलं होतं. जवळपास २० लोक होते. त्यांनी मला पाहिलं. ते  कॅमेऱ्यात मला शूट करणार, तितक्यात मी त्यांना रोखलं. माझ्यावर कृपा करा,  मी त्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. थोडा आदर करा, असं मी त्यांना हात जोडून म्हणालो. बिचाऱ्यांनी माझा मान राखला आणि तुम्ही तुमचं उरका म्हणत निघून गेले. मी आजही ही घटना विसरू शकलेलो नाही.’

करणचा हा किस्सा ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागतात. परिणीती तर हसून हसून अक्षरश: वेडी झाली.

करणने दिग्दर्शित केलेला ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट  2001 मध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करीना कपूर, अमिताभ बच्चन, जया बच्चन, आलोक नाथ आणि फरीदा जलालसोबत यांच्या मुख्य भूमिका होत्या.  हा चित्रपट आयकॉनिक चित्रपट असून त्याने अनेक रेकॉर्ड मोडले होते. 

Web Title: karan johar shares story of suraj hua madham song when he felt embarrassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.