याला का बोलावलं? 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुनला पाहून नेटकरी नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 14:08 IST2023-12-11T14:07:29+5:302023-12-11T14:08:19+5:30
Koffee with karan 8: या शोच्या नव्या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर हजेरी लावणार आहेत.

याला का बोलावलं? 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुनला पाहून नेटकरी नाराज
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या त्याच्या कॉफी विथ करण (Koffee With Karan) या टॉक शोमुळे चर्चेत येत आहे. सध्या या शोचं 8 वं पर्व सुरु असून आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे या शो मुळे अनेक कलाकारांच्या खासगी जीवनातील काही रंजक किस्से उलगडले गेले आहेत. त्यामुळे या शोला प्रेक्षक कायम पसंतीत देतात. परंतु, यावेळी करणला चांगलंच ट्रोल व्हावं लागलं आहे.
कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर हजेरी लावणार आहे. या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून हा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर 'याला का बोलावलं?' असा प्रश्नही नेटकऱ्यांनी करणला विचारला आहे.
'कॉफी विथ करण 8'च्या नव्या भागात अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर हजेरी लावणार आहेत. नुकताच या भागाचा प्रोमो रिलीज झाला. जो पाहुन नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. काहींनी आदित्य रॉय कपूर येणार म्हटल्यावर आनंद व्यक्त केला. तर, काही जणांनी अर्जुनला पाहून नाक मुरडलं.
काय म्हणाले नेटकरी?
'अरे यार या अर्जुनला का बोलावलं?', 'अर्जुनला बाहेर काढा रे', 'यावेळी शोचं बजेट कमी दिसतंय म्हणून याला बोलावलं वाटतं?', 'माहित नाही हे लोक अर्जुन कपूरला का बोलावतात', अशा कितीतरी कमेंट नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.