नेपोटिझमवरुन करण जोहरने स्वत:लाच केलं ट्रोल, 'कॉफी विद करण 8' चा प्रोमो रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 02:54 PM2023-10-04T14:54:09+5:302023-10-04T14:55:26+5:30
यावेळी सिझनमध्ये काय नवीन घेऊन येणार याची हिंटही करणने दिली आहे.
बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहरचा (Karan Johar) सर्वात चर्चेतला शो 'कॉफी विद करण'चा (Koffee With Karan s8) आठवा सिझन येत आहे. आ आठव्या सिझनचा प्रोमो करणने शेअर केला आहे. यामध्ये करणचा डुप्लिकेट त्याला काही प्रश्न विचारतो आणि करणलाच ट्रोल करताना दिसत आहे. तुझा मागचा सिझन तर काही खास झाला नाही, नेपो बेबीजवरुनही तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसतो. पण यावेळी सिझनमध्ये काय नवीन घेऊन येणार याची हिंटही करणने दिली आहे.
कॉफी विथ करणच्या नव्या सिझनच्या प्रोमोमध्ये करण जोहरची आत्मा त्याला ट्रोल करत असते. तुझा शो लोकांना आवडतो पण आता तुला स्टाईल बदलण्याची गरज आहे. शोमध्ये आणखी काही नवीन लोकांना आणण्याची गरज आहे. दरम्यान करण म्हणतो यावेळी मी नवविवाहित जोडप्यांना शोमध्ये बोलवेन. किंवा क्रिकेटर्सला बोलवेन. मात्र करण नक्की काय करणार आहे हे लवकरच कळेल.
कॉफी विथ करण सिझन 8 हॉटस्टारवर २६ ऑक्टोबरपासून सुरु होईल. हा प्रोमो शेअर करत करणने कॅप्शनमध्ये लिहिले,'माझं अंतरात्माही मला आता ट्रोल करत आहे. पण मला काय करायचंय मी तर सिझन 8 घेऊन येतोय.'
करण जोहरच्या शोमध्ये आजपर्यंत अमिताभ बच्चन पासून ते सधअयाच्या स्टारकिड्सपर्यंत सर्वच येऊन गेले आहेत. अगदी क्रिकेटर्सनेही शोमध्ये चार चाँद लावले आहेत. अनेक जण शोमध्ये ट्रोल झाले आहेत तर काहींच्या जोड्याही बनल्या आहेत. आता या नवीन सिझनमध्ये कोणी राजकारणीही येतात का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. नुकतंच परिणीती आणि राघव चड्डा लग्नबंधनात अडकलेत. या दोघांची लव्हस्टोरी करण उलगडणार का हे लवकरच कळेल.