करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचं झालं ब्रेकअप? ३ वर्षात दोघे झाले वेगळे, झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:45 AM2024-06-26T11:45:23+5:302024-06-26T11:46:17+5:30

Tejaswi Prakash And Karan Kundra : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची लव्हस्टोरी सलमान खानचा शो 'बिग बॉस १५'मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती.

Karan Kundra and Tejaswi Prakash broke up? Two separated in 3 years, revealed! | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचं झालं ब्रेकअप? ३ वर्षात दोघे झाले वेगळे, झाला खुलासा!

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशचं झालं ब्रेकअप? ३ वर्षात दोघे झाले वेगळे, झाला खुलासा!

'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) या रिॲलिटी शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्रा(Karan Kundra)ची लव्हस्टोरीदेखील सलमान खानच्या शो 'बिग बॉस १५'मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. आता ते खरंच वेगळे झाल्याचे समजते आहे.

न्यूज १८ शोच्या रिपोर्टमध्ये करण आणि तेजस्वीने तीन वर्षांचे नाते संपुष्टात आणल्याचे समोर आले आहे. महिनाभरापूर्वी झालेला ब्रेकअप लपवून ठेवण्यात आले होते. आता, या कपलच्या जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की त्यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून समस्या होत्या, ज्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विभक्त होण्यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे सूत्राने सांगितले.

सूत्रांनुसार, 'करण आणि तेजस्वी आता एकमेकांना डेट करत नाहीत. त्यांच्या ब्रेकअपला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. जरी त्यांच्या ब्रेकअपचे कारण माहित नसले तरी, इतकेच माहित आहे की गेल्या काही काळापासून त्यांचे एकमेकांशी छोटे-मोठे भांडण होत आहेत.

ब्रेकअपबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच त्यांच्या ब्रेकअपबद्दल कधीही बोलणार नाहीत. रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही ही बातमी चाहत्यांना सांगितली नाही कारण ते तीन वर्षांपासून त्यांच्या चाहत्यांसाठी 'पॉवर कपल' आहेत. त्यामुळे या सत्याला सामोरे जाणे त्याच्या चाहत्यांसाठी सोपे जाणार नाही.

अलिकडेच दोघे झाले होते स्पॉट
आतापर्यंत करण आणि तेजस्वीकडून ब्रेकअपबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, काही काळापूर्वी करण आणि तेजस्वी मुंबईत डिनर डेटवर स्पॉट झाले होते. शटरबग्ससाठी पोझ देताना हे जोडपे एकत्र आनंदी दिसत होते. त्याच्या डेटसाठी करण मेटॅलिक पिंक कलरच्या पॅन्ट सूट आणि पांढऱ्या शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होता. दुसरीकडे, त्याची लेडीलव्ह काळ्या फॉर्मल ड्रेसमध्ये दिसली.

Web Title: Karan Kundra and Tejaswi Prakash broke up? Two separated in 3 years, revealed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.