करण कुंद्राची नवीन कार चोरीला? व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "ज्याने कोणी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 13:50 IST2024-03-07T13:50:01+5:302024-03-07T13:50:31+5:30
करणची नवीन कार गायब झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही माहिती त्याने दिली आहे.

करण कुंद्राची नवीन कार चोरीला? व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "ज्याने कोणी..."
टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा असलेला करण कुंद्रा चर्चेत आला आहे. एकता कपूरच्या कितनी मोहब्बत है या मालिकेतून त्याने पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिकांमधून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणारा करण लक्झरियस आयुष्य जगतो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. पण, नुकतंच त्याची नवीन कार गायब झाली आहे. करणने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे.
करण कुंद्राने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो त्याची कार गायब झाल्याचं म्हणत आहे. "ज्याने कोणी हे केलं आहे, ही गंमत नाही. ती माझी नवीन कार आहे. प्लीज...मी विनंती करतो. ही प्रँक करण्याची वेळ नाही. मी ती कार जास्त चालवलीदेखील नाहीये. आता मला येऊन कोणीतरी सांगितलं की कार गायब आहे. त्यात सिक्युरीटी सिस्टमही नाहीये. त्यामुळे मी ती ट्रॅकही करू शकत नाही. माझी कार कुठे आहे? प्लीज असं करू नका", असं करण या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, करणने मालिकांबरोबरच सिनेमांमध्येही काम केलं आहे. थँक्यू फॉर कमिंग, हॉरर स्टोरी, मुबारकन, १९२१ अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. सध्या करण अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसह रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.