"काकूंचा AI व्हिडिओ बनवला...", तेजस्वी प्रकाशच्या आईबद्दल असा का म्हणाला करण कुंद्रा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:45 IST2025-03-22T14:44:57+5:302025-03-22T14:45:29+5:30

तेजस्वीच्या आईने रिएलिटी शोमध्ये यावर्षी दोघं लग्न करतील असा खुलासा केला होता.

karan kundra on tejasswi prakash s mother spilling beans of both actors marriage | "काकूंचा AI व्हिडिओ बनवला...", तेजस्वी प्रकाशच्या आईबद्दल असा का म्हणाला करण कुंद्रा?

"काकूंचा AI व्हिडिओ बनवला...", तेजस्वी प्रकाशच्या आईबद्दल असा का म्हणाला करण कुंद्रा?

टीव्हीवरील रोमँटिक जोडी करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. दोघंही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यातच आता तेजस्वीच्या आईने रिएलिटी शोमध्ये यावर्षी दोघं लग्न करतील असा खुलासा केला. यावर समोर असलेल्या तेजस्वीची गोंधळलेली रिअॅक्शन होती. तेजस्वीच्या आईच्या या व्हिडिओवर आता करण कुंद्राची मजेशीर प्रतिक्रिया आली आहे.

इंडियन फोरमशी बोलताना करण कुंद्राला लग्नाच्या चर्चांवर आणि तेजस्वीच्या आईच्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला,"नाही, नाही...तो तर एआय व्हिडिओ आहे. आजकाल एआय किती धोकादायक होत चाललंय बापरे! मी सांगतोय ना तो काकूंचा एआय व्हिडिओ होता."

तेजस्वी प्रकाशच्या आईचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी मास्टरशेफ मधला आहे. या शोमध्ये फराह खान तेजस्वीच्या आईला विचारते, 'तुमची मुलगी कधी लग्न करणार?' यावर त्या म्हणतात, 'यावर्षी करेल.' यानंतर फराह खान मजेत म्हणते, "म्हणजे यावर्षी नाम'करण' होणार." यावर सगळेच हसतात. करणने मात्र लग्नाचा प्रश्न पूर्णपणे टाळला आहे. तर दुसरीकडे तेजस्वीने कोर्ट मॅरेजही चालणार आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

तेजस्वी आणि करण 'बिग बॉस सीझन १५' मध्ये एकत्र होते. तिथेच दोघं प्रेमात पडले. तेव्हापासून ते सोबत आहेत. त्यांची क्युट लव्हस्टोरी चाहत्यांचीही आवडती आहे. त्यांच्यात ८ वर्षांचं अंतर आहे. तेजस्वी आणि करणच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title: karan kundra on tejasswi prakash s mother spilling beans of both actors marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.