तेजस्वी प्रकाशसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच करण कुंद्राने शेअर केले थेट 'हे' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 04:18 PM2024-06-16T16:18:09+5:302024-06-16T16:18:58+5:30

करण कुंद्राने थेट सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

karan kundrra shares romantic photos with tejasswi prakash amid breakup rumors | तेजस्वी प्रकाशसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच करण कुंद्राने शेअर केले थेट 'हे' फोटो

तेजस्वी प्रकाशसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच करण कुंद्राने शेअर केले थेट 'हे' फोटो

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा यांची जोडी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सतत रंगताना दिसत आहे. मात्र, तेजस्वी किंवा करण यांच्यापैकी कोणीही ब्रेकअपवर भाष्य केलं नव्हतं. पण आता करण कुंद्राने थेट सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

करणने एक पोस्ट शेअर करत ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अभिनेत्याने आपल्या लेडी लव्हवर प्रेमाचा वर्षाव करणारी एक पोस्ट केली आहे. करण कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तेजस्वी प्रकाशसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.  करण आणि तेजस्वी सध्या व्हेकेशन एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे.  ही रोमँटिक पोस्ट पाहून  चाहते भलतेच खुश झाले आहेत. 

टीव्ही अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट 'बिग बॉस 15'च्या सेटवर झाली. याच शोदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि शो संपल्यानंतरही त्यांचं नातं कायम होतं.  त्यांचे अनेक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान,  काही नेटकऱ्यांचे मते करण आणि तेजस्वीचं ब्रेकअप झालं आहे. यामागे कारण आहे, ते म्हणजे करण आणि २१ वर्षीय टीव्ही अभिनेत्री रीम शेख यांच्या जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. यामुळेच तेजस्वी करणवर नाराज असून त्यांच्यात दुरावा आला आहे. सध्या करण कुंद्रा 'तेरे इश्क मे घायल' मालिकेत भूमिका साकारत आहे. तर रीम शेख त्याची हिरोईन आहे. अशात दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा अफवा पसरल्या आहेत. रीमने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम स्टोरीवर एकतर्फी प्रेमावर पोस्ट केली होती. 

Web Title: karan kundrra shares romantic photos with tejasswi prakash amid breakup rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.