टिव्हीवरील अभिनेत्याने शेअर केला मुलीचा पहिल्यांदा क्युट फोटो, लवकरच दिसणार 'खतरों के खिलाडी'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 16:43 IST2019-12-26T16:38:41+5:302019-12-26T16:43:42+5:30
कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, केसर, काव्यांजली, करम अपना अपना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

टिव्हीवरील अभिनेत्याने शेअर केला मुलीचा पहिल्यांदा क्युट फोटो, लवकरच दिसणार 'खतरों के खिलाडी'मध्ये
करणछोट्या पडद्यावरील मोस्ट पॉप्युलर कपल करण पटेल आणि अंकिता भार्गवच्या घरी एका नन्ही परीचे नुकतेच आगमन झाले आहे. अंकिताने 14 डिसेंबरला एका क्यूट मुलीला जन्म दिला आहे. करणने पहिल्यांदाच सोशल मीडियावर मुलगी मेहरचा फोटो शेअर केला आहे. फोटोत करणने मुलीला आपल्या कुशीत घेतलेले दिसतेय. त्याच्या बाजूला अंकिता सुद्धा उभी आहे. करणने शेअर केलेल्या फोटोत मुलीचा चेहरा अजून स्पष्ट दिसते नाहीय.
करणने कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, केसर, काव्यांजली, करम अपना अपना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही ये है मोहोब्बते या मालिकेमुळे मिळाली. तो नुकताच खतरों के खिलाडी या मालिकेत देखील झळकला होता.
करणप्रमाणेच अंकिता देखील अभिनेत्री आहे. तिने केसर, देखा एक ख्वाव आणि रिपोर्टस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. लवकरच करण खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे. करणने पटेलला ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतील रमन भल्ला या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. यावर्षी जुलैमध्ये करण पटेलने एकता कपूरची सुपरहिट मालिका सोडली आहे. खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासाठी करणने ही मालिका सोडली.