​करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्वपत्नीने त्याच्याच मित्रासोबत केला आहे विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 11:35 AM2017-10-30T11:35:28+5:302017-10-30T17:05:28+5:30

करण सिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. श्रद्धा आणि करण मध्ये सगळे काही ...

Karan Singh Grover's ex-wife has married her friend | ​करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्वपत्नीने त्याच्याच मित्रासोबत केला आहे विवाह

​करण सिंग ग्रोव्हरच्या पूर्वपत्नीने त्याच्याच मित्रासोबत केला आहे विवाह

googlenewsNext
ण सिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. श्रद्धा आणि करण मध्ये सगळे काही सुरळीत सुरू असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण श्रद्धासोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात निकोल अल्वरस आली. निकोल झलक दिखला जा या कार्यक्रमात त्याची कोरिओग्राफर होती. श्रद्धाला हे कळताच तिने लग्नाच्या दहा महिन्यात त्याला घटस्फोट दिला. पण खरी गंमत म्हणजे श्रद्धासोबत लग्न करूनही करण निकोल आणि जेनिफर विंगेट यांना एकत्र डेट करत होता. त्याने श्रद्धासोबत घटस्फोट घेतल्यानंतर निकोलशी लग्न न करता जेनिफरशी लग्न केले.
करणने घटस्फोट दिल्यानंतर श्रद्धाला चांगलाच मानसिक धक्का बसला होता. करण आणि श्रद्धा हे पती-पत्नी असण्याच्या आधी ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्यामुळे श्रद्धाला या सगळ्या धक्क्यातून सावरणे खूप कठीण गेले होते. श्रद्धा देखील एक चांगली अभिनेत्री असून तिने चुडिया, कृष्णा अर्जुन यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. श्रद्धाने करणसोबत लग्न केल्यानंतर तिने ही इंडस्ट्री सोडली. सध्या ती कोणत्याच मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. श्रद्धा आज तिच्या लाईफ मध्ये सेटल असून तिने लग्न देखील केले आहे. 
श्रद्धाने मयांक आनंदसोबत लग्न केले आहे. मयांक हा अभिनेता असून दिल मिल गये या मालिकेत त्याने डॉ. राहुल ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे दिल मिल गये या मालिकेत करण सिंग ग्रोव्हरने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत करण आणि राहुल हे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 
करणसोबत घटस्फोट होण्याआधीपासूनच श्रद्धा आणि मयांक खूप चांगले फ्रेंड्स होते. करण सोबत घटस्फोट झाल्यानंतर श्रद्धा मयांक सोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम करत होती. त्यांचे आता अनेक बुटिक आहेत. त्या दोघांच्या मध्ये कालांतराने प्रेम फुलले आणि त्यांनी २०१३ मध्ये लग्न केले. सध्या ते दोघे मिळून त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत. 

shraddha nigam and mayank anand

Also Read : करण सिंग ग्रोव्हरने तीन लग्न करण्यासोबतच या अभिनेत्रीशीही केला होता साखरपुडा

Web Title: Karan Singh Grover's ex-wife has married her friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.