लग्नाच्या चर्चेदरम्यान करिश्मा तन्नाने शेअर केला थेट बेडरुममधला व्हिडीओ, इंटरनेटचा वाढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:32 IST2021-12-18T17:29:09+5:302021-12-18T17:32:28+5:30
टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन' फेम करिश्मा तन्ना (Karishma Tanna) तिच्या स्टायलिश स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

लग्नाच्या चर्चेदरम्यान करिश्मा तन्नाने शेअर केला थेट बेडरुममधला व्हिडीओ, इंटरनेटचा वाढला पारा
टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन' फेम करिश्मा तन्ना (Karishma Tanna) तिच्या स्टायलिश स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री तिच्या लग्नाला घेऊन खूप चर्चेत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर करिश्मा पुढील वर्षी ५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत सात फेरे घेणार आहे.
या बातम्यांदरम्यान आता करिश्माचा बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने नुकताच बेडरूमचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'Kina chir' या गाण्यावर करिश्मा जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओमध्ये करिश्माच्या लूकबद्दल बोलायचे तर तिने फुल स्लीव्ह ब्लॅक टॉप आणि ग्रे जीन्स घातली आहे. अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे. व्हिडिओ शेअर करताना करिश्माने कॅप्शनमध्ये 'In love with this song' असे लिहिले आहे.
आता करिश्माचा हा बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबतच सर्व यूजर्स व्हिडिओवर कमेंट करत आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
मीडिया रिपोर्ट्नुसार, करिश्मा लवकरच तिचा बॉयफ्रेंड वरुण बंघेरासोबत सात फेरे घेणार आहे. खरे तर ४ फेब्रुवारीपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 4 फेब्रुवारी रोजी हळदी, मेहंदी व संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे करिश्माने तिच्या लग्नाच्या आणि डेटिंगच्या बातम्यांवर पूर्णपणे मौन बाळगले आहे. तिने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची भेट एका कॉमन फ्रेंड सुवेद लोहियाच्या माध्यमातून झाली.