'नवा गडी नवं राज्य'मधील कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 04:48 PM2022-09-05T16:48:32+5:302022-09-05T16:49:02+5:30

Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिले की कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला.

Karnik in 'Nava Gadi Nava Rajya' left for the darshan of the Lalbagh raja | 'नवा गडी नवं राज्य'मधील कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला

'नवा गडी नवं राज्य'मधील कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला

googlenewsNext

नवा गडी नवं राज्य ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिले की कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला. त्यामुळे रमा सहीत सर्व मंडळी फारच खुश आहे. येत्या भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल की चिंगीला तिच्या मित्र मैत्रिणी सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचे आहे आणि आनंदीची देखील तशी इच्छा आहे. राघव दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबाग राजाच्या दर्शनाला घेऊन जातो.

नवा गडी नवं राज्य भागाच्या चित्रीकरणावेळेसचे अनुभव सांगताना मालिकेचा लेखक प्रह्लाद कुडतरकर म्हणाला, "लालबागच्या राजाचा विजय असो.." ही घोषणा करत, ऐकत  गिरणगावात बालपण गेलं.. राजाचा आशीर्वाद कायम पाठीशी असायचा.. तोच आताही आहे.. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या इथे मालिकेचं शुटींग ही गोष्ट कुणालाही सांगितल्यावर अशक्य वाटली. अर्थातच भाविकांची राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी.. त्याची सगळ्यांना असणारी ओढ. यामुळे सगळ्यांना असं वाटून गेलं.. पण लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने झी मराठीवरील "नवा गडी नवं राज्य" या मालिकेचं चित्रीकरण झालं.. त्यामागे अर्थातच सगळ्या टीमची मेहनत आहे. 


ते पुढे म्हणाले की, विशेष उल्लेख करावासा वाटतो तो लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा.. भाऊंनी (सुधीर साळवी) दिलेलं सहकार्य खूपच महत्वाचं होतं.. नवा गडी नवं राज्य मालिकेची टीम.. झी मराठीची टीम.. आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या सगळ्यांच्या मेहनतीने हे भाग चित्रित झाले आहेत.. राजाचा आशीर्वाद आहे.  'नवा गडी नवं राज्य' लालबाग विशेष भाग गुरुवारी ८ सप्टेंबर रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: Karnik in 'Nava Gadi Nava Rajya' left for the darshan of the Lalbagh raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.