​आरंभमधील एका दृश्यासाठी कार्तिका नायरने केला दोन दिवस सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2017 10:28 AM2017-05-11T10:28:36+5:302017-05-11T15:58:36+5:30

बाहुबली 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंतचे सगळे बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. सध्या ...

Kartika Nayar practiced for two days for a first look | ​आरंभमधील एका दृश्यासाठी कार्तिका नायरने केला दोन दिवस सराव

​आरंभमधील एका दृश्यासाठी कार्तिका नायरने केला दोन दिवस सराव

googlenewsNext
हुबली 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंतचे सगळे बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. सध्या हा चित्रपट, चित्रपटाची कथा, चित्रपटातील कलाकार या सगळ्यांचेच कौतुक होत आहे. या चित्रपटाची कथा एस. राजामौली यांनी लिहिली असून ते लवकरच छोट्या पडद्यावर एक मालिका घेऊन येत आहेत. आरंभ ही मालिका ते सादर करत असून या मालिकेत प्रेक्षकांना आर्य आणि द्रविड संस्कृतीमधला संघर्ष पाहायला मिळणार आहे. या मालिकेत रजनीश दुग्गल, दाक्षिणात्य अभिनेत्री कार्तिका नायर आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आरंभ ही बिग बजेट मालिका असून या मालिकेचे बजेट एखाद्या चित्रपटाएवढे आहे. ही एक ऐतिहासिक मालिका असून यात प्रेक्षकांना तलवारबाजीप्रमाणेच भव्य स्तरावरील युद्धाचे चित्रण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत हत्तीवर बसलेल्या कार्तिकाला घोड्यावरील रजनीशसोबत लढाई करताना दाखवण्यात आलेले आहे. हा प्रसंग अगदी खरा वाटावा यासाठी या दृश्याच्या चित्रीकरणाच्या दोन दिवस आधीपासून कार्तिकाने सराव केला होता. या दृश्यासाठी तिने खूप तयारी केली होती. त्यानंतरच ती हे दृश्य चित्रीत करायला तयार झाली. अतिशय चांगला सराव केला असल्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि अचूकतेने तिने या प्रसंगाचे चित्रण पहिल्या फटक्यातच पार पाडले. या प्रसंगाच्या तयारीबाबत कार्तिका सांगते, हातात कुऱ्हाड घेऊन आणि हत्तीवर बसून युद्ध करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. या प्रसंगात मला अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार होती. पण माझ्या प्रशिक्षकांच्या टीमने त्याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. 

Web Title: Kartika Nayar practiced for two days for a first look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.