ही मालिका पाहून भडकले फॅन्स, एकता कपूरला म्हटले मानसिकदृष्ट्या आजारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 01:24 PM2019-07-12T13:24:15+5:302019-07-12T13:34:29+5:30
एकताने लग्न आणि प्रेमाचा खेळ मांडलाय, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजरने एकताला थेट मानसिकदृष्ट्या आजारी म्हटले आहे.
‘कसौटी जिंदगी की’ या पहिल्या सीझनमध्ये प्रचंड मेलोड्रामा होता. ‘कसौटी जिंदगी की 2’ या दुस-या सीझनमध्ये तर त्यापेक्षा अधिक मेलोड्रामा सुरु आहे. प्रेरणा अगतिक होऊन मिस्टर बजाजसोबत लग्न करते, असे या मालिकेच्या पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. दुस-या सीझनमध्येही याच प्लॉटची पुनरावृत्ती केली जातेय. प्रेरणाने मिस्टर बजाजसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिस्टर बजाजसोबत ती लग्न मंडपातही पोहोचली आहे. पण सध्या तरी हा प्लॉट पाहून लोक भडकले आहेत. इतके की, त्यांनी ‘कसौटी जिंदगी की 2’ची निर्माती एकता कपूरला ट्रोल करणे सुरु केले आहे.
Anurag aur Prerna Prerna anurag dono eak dusre k liye bane hai dono eak dusre k bina adhure hai yeh jan tey hue bhi hum sath nahi ho sak tey jasey rail ki do patriye eak k bina dusra adhura hai jab sath hai to milo ka safer tay karta hai par mil nahi pata hai #KasautiiZindagiiKaypic.twitter.com/3wkCw1s817
— prerna EricaFernandes🐰😍🐧 (@srija_ma) July 11, 2019
प्रेरणा लाचारी पत्करून मिस्टर बजाजसोबत लग्नासाठी तयार होते, हे लोकांना जराही आवडलेले नाही. सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सनी यावरून एकताला नाही नाही ते सुनावले आहे.
Ekta didi, from next time b careful b4 you throw something at the youth and invite them to watch your content. Coz we don't give an Eff about your TRP tactics. We want BETTER CONTENT. If not given, its only you who'll be watching your show. Enough is enough.#KasautiiZindagiiKay
— •νιѕну• (@secretive_soul_) July 12, 2019
एकताने लग्न आणि प्रेमाचा खेळ मांडलाय, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजरने एकताला थेट मानसिकदृष्ट्या आजारी म्हटले आहे.
I really think that Ekta is mentally ill I mean what is her problem 😂😂we are in 2019 not 2000 what kind of story is this which a kid can write better than this 😁✋#KasautiiZindagiiKayhttps://t.co/sAxiEAPizx
— The Head&The Heart (@entesar112) July 12, 2019
‘माझ्या मते, एकता मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिची नेमकी अडचण काय आहे? आम्ही 2000 मध्ये नाही तर 2019 मध्ये आहोत. ही काय कथा आहे? लहान मुलं ही यापेक्षा चांगली कथा लिहू शकेल,’असे या युजरने म्हटले आहे.
Parth and erica is performing their best according to the script but the storyline is utter nonsense and unbearable🤷🏻 this show never deserved #ParthSamthaan and #EricaFernandes #kasautiizindagiikay
— "You are My favorite star"❤️ (@Muhsina33092450) July 12, 2019
एकताने या प्रतिक्रियांतून तरी धडा घ्यावा, असेच अनेकांचे मत आहे. पण त्याची शक्यता कमी आहे. एकताच्या प्रत्येक मालिकेत प्रचंड मेलोड्रामा पाहायला मिळतो. ‘कसौटी जिंदगी की 2’मध्येही हेच दिसतेय. आता फक्त टीआरपी चार्टवर याचा फटका एकताला बसू नये, म्हणजे मिळवले.