Video: 'कशी झोकात चालली...'; सीमा देव यांच्या गाण्यावर मानसी नाईकने दिले अफलातून एक्स्प्रेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 14:57 IST2023-09-20T14:56:57+5:302023-09-20T14:57:56+5:30
Manasi naik: मानसी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम वरचेवरच तिचे व्हिडीओ शेअर करत असते.

Video: 'कशी झोकात चालली...'; सीमा देव यांच्या गाण्यावर मानसी नाईकने दिले अफलातून एक्स्प्रेशन्स
आपल्या बोलक्या डोळ्यांनी आणि नृत्यकौशल्याने अनेकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (manasi naik). गेल्या काही दिवसांपासून मानसी सातत्याने चर्चेत येत आहे. कधी तिच्या म्युझिक अल्बममुळे तर कधी तिच्या खासगी आष्युष्यामुळे ती सतत नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्येच आता मानसीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मानसी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम वरचेवरच तिचे व्हिडीओ शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नऊवारी साडी नेसली असून त्यावर मराठमोळा साजशृंगार केला आहे. सोबतच तिने कशी झोकात चालली कोळ्याची पोर, या गाण्यावर तिने उत्तम नृत्य सादर केलं आहे.
दरम्यान, मानसीने सादर केलेलं हे गाणं मोलकरीण सिनेमातील आहे. या गाण्याचे गीतकार ग.दी. माडगुळकर असून आशा भोसले आणि वसंत देसाई यांचा सुमधूर स्वरसाज लाभलेला आहे.