KBC-11 : अमिताभ बच्चन यांना झालाय ‘हा’ आजार, स्वाक्षरी करताना थरथरतात हात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 10:51 AM2019-09-27T10:51:39+5:302019-09-27T10:52:00+5:30
केबीसीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये अमिताभ नव-नवे खुलासे करतात, नव-नवे किस्से ऐकवतात. काल प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी प्रकृतीविषयक खुलासा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
‘कौन बनेगा करोडपती’चे 11 वे सीझन हळूहळू लोकप्रियतेचा कळस गाठतेय. साहजिकच हा शो होस्ट करणारे महानायक अमिताभ बच्चन चर्चेत आहेत. केबीसीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये अमिताभ नव-नवे खुलासे करतात, नव-नवे किस्से ऐकवतात. काल प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी प्रकृतीविषयक खुलासा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
होय, काल गुरुवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये 66 वर्षीय स्पर्धक अनिल जोशी यांच्याशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी अनेकदा मेमरी लॉस होत असल्याचे सांगितले.
‘अनेकदा मी माझ्या रूममध्ये जातो आणि मी या रूममध्ये का आलो, हेच विसरून जातो. खरे तर मी काही तरी घेण्यासाठी रूममध्ये जातो. पण रूममध्ये गेल्यावर आपण कशासाठी आलोय, हे मला आठवत नाही. मग पुन्हा रूमबाहेर जातो आणि माझी पत्नी किंवा घरातील इतर सदस्यांना मी रूममध्ये का गेलो होतो, असा प्रश्न करतो. अर्थातच त्यांच्याकडे याचे उत्तर नसते,’ असे त्यांनी सांगितले.
केवळ इतकेच नाही तर अनेकदा माझे हात थरथरतात, असा खुलासाही त्यांनी केला. ‘अनेकदा माझ्या हाताची बोट नीट काम करत नाहीत. माझा हात सतत थरथरत असतो. अनेकदा सही करत असताना माझे हात थरथरतात आणि मला सही करणेही कठीण जाते,’ असे त्यांनी सांगितले.
अमिताभ यांच्या हाताच्या मासंपेशी तुटल्यामुळे त्यांचा एक हात आता व्यवस्थित काम करत नाही. त्यांना हा हात नीट वर उचलता येत नाही. केबीसीच्या सुरुवातीलाच त्यांनी हा खुलासा केला होता.
T 3293 - ... and the day endeth with an invite by Sony Television to come over for a celebration .. a success celebration .. for it has become the No 1 channel this week .. and KBC the No 1 programme in the non fiction section
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 19, 2019
My congratulations to Team KBC pic.twitter.com/uzAiwsnEmo
टीबीबद्दलही केला होता खुलासा
केबीसीच्या एका एपिसोडमध्ये त्यांनी हेपेटायटिस आणि टीबी या आजाराबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, कुली सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी मला दुखापत झाली होती. जवळपास 200 लोकांनी मला रक्त दिले होते. त्यावेळी ‘हेपेटायटिस बी’ने संक्रमित रक्तामुळे माझे लिव्हर 75% खराब झालेत. याशिवाय मला टीबीचीही लागण झाली होती. पण मला चार वर्षांनंतर या आजाराबद्दल कळले. तोपर्यंत मला टीबी झाला, हे मला माहितही नव्हते.