KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 09:53 AM2020-11-20T09:53:16+5:302020-11-20T09:56:52+5:30

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केबीसीमधील पाच असे प्रश्न ज्यांची किंमत ५० लाखांपासून ते ७ कोटी रूपयांपर्यंत आहे.

Kaun Banega Crorepati 12 : 5 questions which made contestants win | KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल!

KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल!

googlenewsNext

कौन बनेगा करोडपती सीझन १२ बघून तुम्हाला तुमच्या जनरल नॉलेजचा अंदाज आला असेलच. अशात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केबीसीमधील पाच असे प्रश्न ज्यांची किंमत ५० लाखांपासून ते ७ कोटी रूपयांपर्यंत आहे. या कठिण प्रश्नांची उत्तरे देऊनच हॉटसीवर बसलेले अनेक स्पर्धक मोठी रक्कम जिंकण्यात यशस्वी ठरले. चला जाणून घेऊन ते प्रश्न आणि त्यांचं उत्तरे ज्यांनी लोक मालामाल झाले.

1) भारतात प्रकाशित होणारं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं ?

A-बॉम्बे समाचार
B-हिकीज बंगाल गजट
C-मद्रास कुरियर
D-द बॉम्बे हेराल्ड

या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय B हिकीज बंगाल गॅजेट. हा प्रश्न ५० लाख रूपयांसाठी केबीसी स्पर्धक रूबी सिंह यांना विचारण्यात आला होता.

2) यातील कोणत्या पर्यावरणवाद्याला हिमाचल प्रदेशातील बेकायदेशीर उत्खनना विरोधात लढाई लढण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी ओळखलं जातं?

A-किंकरी देवी
B-दया बाई
C-मानसी प्रधान
D-चुनी कोटल

या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय A आहे. किंकरी देवी. हा प्रश्न ५० लाख रूपयांसाठी फूलबासन यादव यांना विचारण्यात आला होता.

3) २०२४ पर्यंत पहिली महिला आणि पुरूष चंद्रावर पाठवण्यासाठी अमेरिकन अंतराळ कार्यक्रमाचं नाव कोणत्या यूनानी देवीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे?

A-रिया
B-नेमेसिस
C-एफ्रोडाइट
D-अर्टेमिस

या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय D अर्टेमिस. हा प्रश्न १ कोटी रूपयांसाठी केबीसी स्पर्धक छवि कुमार यांना विचारण्यात आला होता.

4) यांपैकी कोणत्या अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट फीमेल प्लेबॅक सिंगर राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता?

A-दीपिका चिखलिया
B-रूपा गांगुली
C-नीना गुप्ता
D-किरन खेर

या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय B रूपा गांगुली. हा प्रश्न १ कोटी रूपयांसाठी केबीसी स्पर्धक नाझिया नसीम यांना विचारण्यात आला होता. त्यांनी याचं बरोबर उत्तर दिलं होतं.

5) नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये पहिल्यांदा कुठे आझाद हिंद सरकारची घोषणा केली होती?

A-कॅथे सिनेमा हॉल
B- फोर्ट कॅनिंग पाक
C- नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ़ सिंगापूर
D- नॅशनल गॅलरी सिंगापूर

या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय A कॅथे सिनेमा हॉल हा प्रश्न ७ कोटी रूपयांसाठी केबीसी स्पर्धक नाझिया नसीम यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला होता.
 

Web Title: Kaun Banega Crorepati 12 : 5 questions which made contestants win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.