KBC च्या या स्पर्धकाने दिलं सीझनमधील सर्वात वेगवान उत्तर, इतक्या सेकंदात केलं लॉक....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 09:11 AM2020-12-18T09:11:31+5:302020-12-18T09:13:40+5:30

कौन बनेगा करोडपतीचा हा शेवटचा आठवडा आहे आणि अमिताभ बच्चन या किड्स स्पेशल वीकमध्ये लहान मुलांसोबत गेम खेळळत आहे.

Kaun Banega Crorepati 12 : Little contestant locked fastest finger first question in record time | KBC च्या या स्पर्धकाने दिलं सीझनमधील सर्वात वेगवान उत्तर, इतक्या सेकंदात केलं लॉक....

KBC च्या या स्पर्धकाने दिलं सीझनमधील सर्वात वेगवान उत्तर, इतक्या सेकंदात केलं लॉक....

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती' या सीझनमध्ये एकापेक्षा स्पर्धक आले आणि सर्वांनीच दमदार खेळ खेळला. या सीझनमध्ये शो ला अनेक करोडपतीही मिळाले. मात्र, गुरूवारच्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर असलेल्या चिमुकल्या स्पर्धकाने या सीझनमधील आतापर्यंत इतर स्पर्धकांनी केलेला रेकॉर्ड तोडलाय. या स्पर्धकाने सर्वात वेगवान फास्टेस्ट फिंगर फर्स्ट क्वश्चनचं उत्तर देण्याचा रेकॉर्ड बनवला. 

काश्मीर  श्रीनगरहून आलेली प्रिया कौर या सीझनची शेवटची स्पर्धक ठरली. कारण शुक्रवारी प्रिया कौरकडून ५० लाखांचा प्रश्न खेळल्यानंतर शोममध्ये कर्मवीर स्पर्धकाची एन्ट्री होईल. प्रिया कौरने केवळ २.६७ सेकंदात प्रश्नाचं उत्तर दिलं. अमिताभ बच्चन यांनी जेव्हा प्रिया कौरचं नाव घेतलं तेव्हा ती भावूक झाली आणि हॉटसीटवर येऊन स्थिरावली.

कौन बनेगा करोडपतीचा हा शेवटचा आठवडा आहे आणि अमिताभ बच्चन या किड्स स्पेशल वीकमध्ये लहान मुलांसोबत गेम खेळळत आहे. या आठवड्यात कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होणारे सगळे लहान मुले असणार आहेत. त्यांना प्रश्नाची उत्तरे दिल्यावर काही पॉइंट्स दिले जाणार आहेत. 

पॉइंट जिंकून काय करणार मुले?

या आठवड्यात मुलं जेवढ पॉइंट जिंकतील तेवढी रक्कम त्यांच्या नावाने फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले जमा केले जातील. मुले १८ वर्षांचे होईपर्यंत या रकमेवर त्यांना व्याज मिळेल आणि त्यानंतर ते रक्कम काढू शकतील. तेव्हा ते त्यांना हवा तसा या रकमेचा वापर करू शकतील.
 

Web Title: Kaun Banega Crorepati 12 : Little contestant locked fastest finger first question in record time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.