KBC मध्ये २५ लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न आणि त्याचं उत्तर....
By अमित इंगोले | Published: October 28, 2020 09:27 AM2020-10-28T09:27:05+5:302020-10-28T09:27:50+5:30
श्रुती प्रश्नांची उत्तरे त्यांना अजिबातच माहीत नव्हती. त्यासाठी त्यांनी लाइफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. श्रुती आणि अमिताभ बच्चन यांच्या मजेदार बातचीतही लोकांनी एन्जॉय केली.
कौन बनेगा करोडपतीच्या मंगळवारी झालेल्या एपिसोडची सुरूवात सोमवारच्या रोलओवर स्पर्धक श्रुती सिंह यांच्यासोबत झाली. श्रुती वलसाड गुजरात येथे एक सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी खेळाची सुरूवात फारच चांगली करत१२ लाख ५० रूपयांची रक्कम जिंकली. श्रुतीने काही प्रश्नावर लाइफलाईनचाही वापर केला होता.
श्रुती प्रश्नांची उत्तरे त्यांना अजिबातच माहीत नव्हती. त्यासाठी त्यांनी लाइफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. श्रुती आणि अमिताभ बच्चन यांच्या मजेदार बातचीतही लोकांनी एन्जॉय केली. पण श्रुती २५ लाख रूपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. या प्रश्नापर्यंत येईपर्यंत त्यांच्या सर्व लाइफलाईनही संपल्या होत्या. त्यांना या प्रश्नाचं उत्तरही माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला. (KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा!)
काय होता २५ लाख रूपयांचा प्रश्न?
श्रुतीला २५ लाख रूपयांसाठी कौन बनेगा करोडपतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, आशियाई खेळात कुस्तीत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? (KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि.....)
ए.गीता फोगाट
बी. विनेश फोगाट
सी. बबीता फोगाट
डी. साक्षी मलिक
सुरूवातीपासून जास्तीत जास्त प्रश्नांवर योग्य अंदाज लावणाऱ्या श्रुती या प्रश्नावर अडकल्या. आणि २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी गेसवर्क न करण्याचा निर्णय घेतला. श्रुती यांनी जेव्हा खेळ क्विट केला तेव्हा अमिताभ यांनी श्रुती यांना उत्तर गेस करायला सांगितलं. तेव्हा श्रुती यांनी साक्षी मलिक हे उत्तर गेस केलं. पण बरोबर उत्तर विनेश फोगाट हे होतं. (KBC : अमिताभ म्हणाले जिंकलेल्या रकमेचं काय करणार? स्पर्धकाने दिलेलं उत्तर ऐकून झाले अवाक्)