'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 1 कोटींसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:10 PM2024-09-25T12:10:28+5:302024-09-25T12:10:52+5:30

उज्जवल प्रजापतीने प्रश्नांची उत्तरे देत 50 लाख रुपये जिंकले आणि 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. 

Kaun Banega Crorepati 16 Amitabh Bachchan asked question related to Treaty of Versailles for one Crore | 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 1 कोटींसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 1 कोटींसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

Kaun Banega Crorepati : सध्या अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या KBC 16 ची चांगलीच चर्चा आहे. बिग बी पुन्हा एकदा त्याच सळसळत्या एनर्जीत KBC 16 चं होस्टिंग करत आहेत. KBC 16 मध्ये यंदाही विविध सामाजिक स्तरांमधून आलेले स्पर्धक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहभागी झाले आहेत.  परंतु आत्तापर्यंत कोणालाही एक कोटी रुपये जिंकता आलेले नाहीत. नुकतंच उज्ज्वल प्रजापती नावाचा स्पर्धक हॉट सीटवर बसला.  उज्जवल प्रजापतीने प्रश्नांची उत्तरे देत 50 लाख रुपये जिंकले आणि 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. 

 'कौन बनेगा करोडपती'च्या 24 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये राजस्थानमधील स्पर्धक उज्ज्वल प्रजापतीला पहिल्या महायुद्धाशी संबंधित 1 कोटी रुपयांच्या आव्हानात्मक प्रश्नाला सामोरे जावे लागले. पण, उत्तर माहिती नसल्याने त्याने 50 लाख रुपये घेऊन KBC सोडण्याचा निर्णय घेतला. उज्ज्वल हा हुशार विद्यार्थी असून तो नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य सुधारण्याच्या इच्छेने तो या शोमध्ये आला होता. विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागरी सेवा प परीक्षेची तयारी सुरू केली. आत्मविश्वास आणि उत्साहाने खेळाला सुरुवात करणाऱ्या उज्ज्वलने अनेक प्रश्नांची उत्तरे देत एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचला होता. 


 कोणता होता 1 कोटींचा प्रश्न ?

होस्ट अमिताभ बच्चन यांनी उज्ज्वलला एका संस्थानाच्या शासकाबद्दल विचारले होते, ज्याने १९१९ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर भारताच्या वतीने व्हर्सायच्या तहावर स्वाक्षरी केली होती. त्याला उत्तर म्हणून  A - महाराजा सवाई जयसिंग, B - निजाम मीर उस्मान अली खान, C - नामीद हमिदुल्ला खान, D - ममहाराजा राव गंगा सिंग हे चार पर्याय देण्यात आले.

बरोबर उत्तर कोणते ?
एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर महाराजा राव गंगा सिंग होते. चौथा पर्याय बरोबर होता, पण उज्ज्वल उत्तर देऊ शकला नाही. 

Web Title: Kaun Banega Crorepati 16 Amitabh Bachchan asked question related to Treaty of Versailles for one Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.