‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी बिग बी घेतात 'इतकं' मानधन, आकडा वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 07:08 PM2023-08-11T19:08:52+5:302023-08-11T19:08:52+5:30
KBC 15 : ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन घेतात कोट्यवधींचं मानधन
‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. अनेक सामान्य व्यक्तींना या शोमध्ये सहभागी होत कोट्याधीश होण्याची संधी मिळते. २००० साली सुरू झालेल्या या शोचा १५वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या सीझनपासूनच या शोला पसंती मिळाली आहे. बिग बी अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करतात. या नव्या पर्वासाठी बीग बी सज्ज झाले आहेत. पण लोकप्रिय असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बी किती मानधन घेतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
या शोच्या पहिल्या सीझनमध्ये एक कोटी जिंकण्याची संधी प्रेक्षकांना देण्यात आली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये ही रक्कम दुप्पट करण्यात आली. ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिसऱ्या सीझनमध्येही दोन कोटी रक्कम ही बक्षिसाची रक्कम होती. परंतु, त्यानंतर चौथ्या सीझनमध्ये ही रक्कम पुन्हा एक कोटी करण्यात आली. त्यानंतर २०१३ साली ही रक्कम वाढवून सात कोटी करण्यात आली. ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या बक्षिसाची रक्कम काही वेळेस कमी करण्यात आली होती. परंतु, बिग बींचे मानधन मात्र कमी झाले नाही.
“चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे काही फोटो”, मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं ट्वीट
‘कौन बनेगा करोडपती’च्या पहिल्या सीझनसाठी अमिताभ बच्चन यांनी प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये मानधन घेतलं होतं. पहिला सीझन हिट ठरल्यानंतर त्यांनी मानधनात वाढ करत १ कोटी रुपये आकारले होते. मीडिया रिपोर्टनुसार, सहाव्या आणि सातव्या सीझनसाठी बिग बींनी १.५ ते २ कोटी मानधन घेतलं होतं. त्यानंतर आठव्या सीझनच्या एका एपिसोडसाठी त्यांनी २ कोटी रुपये आकारले होते.
“महाराष्ट्र खरंच भारी आहे का?”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष
अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या लोकप्रियतेत झालेली वाढ पाहून पुन्हा नवव्या सीझनसाठी मानधनात वाढ करत २.६ कोटी आकारले होते. १०व्या सीझनसाठी त्यांनी ३ कोटी मानधन घेतलं होतं. तर ११ ते १३ या सीझनदरम्यान बिग बींनी ३.५ कोटी रुपये फी घेतली होती. 'कौन बनेगा करोडपती'चा १५वा सीझन १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.