KBC: शेतकरी तरूणाने जिंकले ५० लाख रूपये, १ कोटीच्या 'या' प्रश्नावर क्विट केला खेळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 09:30 AM2020-12-04T09:30:56+5:302020-12-04T09:33:20+5:30
तेज बहादुर सिंह असं या स्पर्धकाचं नाव. त्याने पूर्ण खेळ फार समजदारी आणि विचार करून खेळला. गरज पडली तेव्हा त्याने लाइफलाईनचाही वापर केला.
कौन बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनने इतिहास रचला आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत तीन करोडपती मिळाले आहेत. आता एका शेतकरी तरूणाने १४ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन ५० लाख रूपये जिंकले आहेत. या स्पर्धकाने खेळ इतका चांगला खेळला की, अमिताभ बच्चन त्याचं भरभरून कौतुक करत होते.
तेज बहादुर सिंह असं या स्पर्धकाचं नाव. त्याने पूर्ण खेळ फार समजदारी आणि विचार करून खेळला. गरज पडली तेव्हा त्याने लाइफलाईनचाही वापर केला. त्याने इतका चांगला खेळ खेळला की, अमिताभ यांना त्याला १ कोटी रूपयांचा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. पण तेज १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही. चला जाणून घेऊ काय होता १ कोटी रूपयांचा प्रश्न...
१८५७ च्या उठावात महत्वाची भूमिका बजावणारे मंगल पांडे यांचा संबंध यातील कोणत्या रेजिमेंटसोबत होता?
आता तेजला १ कोटीच्या प्रश्नावर रिस्क घ्यायची नव्हती. तो पुन्हा पुन्हा हेच म्हणत होता की, त्याने जर चुकीचं उत्तर दिलं तर त्याचं शिक्षण अपूर्णच राहील. अशात त्याने ५० लाख रूपये वाचवण्यासाठी आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी शो क्विट केला. तसं मंगल पांडेसंबंधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर ३४वी बंगाल नेटिव इंफेंट्री असं आहे.
संघर्षाचं जीवन
खेळादरम्यान तेजने आपल्या संघर्षाबाबत सांगितलं. त्याने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान त्याच्या आई-वडिलांची नोकरी देली होती. ज्यामुळे त्याने शेती करणं सुरू केलं. सोबतच त्याला त्याचं शिक्षणही सुरू ठेवायचं होतं त्यामुळे तो शेतातील कामे झाल्यावर अभ्यास करत होता.
तेज बहादुरचं एक कोटी जिंकण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पण ५० लाख जिंकून तो आनंदी आहे. या सीझनमध्ये याआधी नाझिया नसीम, मोहिता कुमार आणि अनुपा दास यांनी १ कोटी रूपये जिंकण्याचा कारनामा केलाय. या तिनही महिलांना एक कोटी जिंकले. पण अजून एकही स्पर्धक ६ वर्षाआधीचा रेकॉर्ड तोडू शकलं नाही. ६ वर्षाआधी नरूला ब्रदर्सनी ७ कोटी रूपये जिंकले होते. हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही तोडू शकलं नाही.