दहा वर्षांचा मुलगा ६,४०,००० जिंकणार होता, पण...; KBC मध्ये पहिल्यांदाच घडलेल्या प्रकारानं बिग बींनाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:48 AM2022-12-16T11:48:57+5:302022-12-16T12:00:25+5:30

Kaun Banega Crorepat : अमिताभ बच्चन म्हणाले, शोमध्ये पहिल्यांदाच असा प्रकार घडला. ज्यामुळे खरंतर त्यांनाही धक्का बसला.

Kaun Banega Crorepati Junior contestant Divit Bhargava lost game expert advivce goes wrong | दहा वर्षांचा मुलगा ६,४०,००० जिंकणार होता, पण...; KBC मध्ये पहिल्यांदाच घडलेल्या प्रकारानं बिग बींनाही धक्का

दहा वर्षांचा मुलगा ६,४०,००० जिंकणार होता, पण...; KBC मध्ये पहिल्यांदाच घडलेल्या प्रकारानं बिग बींनाही धक्का

googlenewsNext

बॉलिवूडचे शेहनशहा अर्थात अमिताभ बच्चन (KBC Amitabh Bachchan) यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा शो अत्यंत लोकप्रिय आहे. केबीसीचा चौदावा सीझन सुरू असून यामध्ये कंटेस्टेंट आपल्या ज्ञानाच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात. पण आता पुढच्या आठवड्यापासून या कार्यक्रमात काही खास पाहुणे येणार आहेत. केबीसीच्या मंचावर सध्या बच्चे कंपनीची चांगलीच जोरात आहे. केबीसीच्या मागच्या भागात प्राप्ती शर्मा ३ लाख २० हजार रुपये जिंकली.  यानंतर फास्टेट फिंगर राऊंड जिंकून दिवित भार्गव हॉटसीटवर पोहोचला. अमिताभ बच्चन यांच्यासमोर बेंगळुरु-कर्नाटकचा १० वर्षांच्या दिवित येऊन बसतो.  

हॉट सीटवर पोहोचल्यावर, इतर स्पर्धकांप्रमाणे दिवित देखील आनंदीने नाचतो. यानंतर तो शोचा पहिला टप्पा पार करून 10000 ची रक्कम मिळवतो. 20,000 च्या प्रश्नावर तो ऑडियन्स पोल  वापरतो. हळुहळू खेळत दिवित 80,000 चा प्रश्न गाठतो आणि ज्ञानस्त्र लाईफलाईन (kbc lifelines) वापरून त्याने हा टप्पा देखील पार केला.

 शोच्या या एपिसोडचे एक्सपर्ट सृजन पाल सिंग होते.तो स्पर्धक त्याची मदत घेतो यापैकी कोणत्या डायनासोरच्या नावाचा अर्थ 'थंडर लिझार्ड' आहे? तो 50-50 लाइफलाइनची मदत घेतो आणि पर्याय A) ब्रोंटोसॉरस निवडतो आणि 3,20,000 गुण जिंकतो.  6 लाख 40 हजरांच्या प्रश्नाचे उत्तर देताना, दिवित गोंधळून गेला आणि तो शेवटची लाईफनलाईन वापरण्याचा निर्णय घेतो.Expert Opinion' ही लाईफलाईन वापरतो. प्रश्न असतो कोणत्या क्षेत्रात पती-पत्नी जोडीला संयुक्तपणे नोबेल पारितोषिक मिळालेले नाही?  या एपिसोडचे तज्ज्ञ सृजन पाल सिंग होते.


३ लाख २० हजारांच्या प्रश्नावर गोंधळला
त्यांनी दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार म्हणून काम केले, जे एक प्रसिद्ध  शास्त्रज्ञ आणि लेखक देखील होते. सृजन पाल यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल फारशी खात्री नव्हती, ते म्हणाले D पर्याय निवडता येईल, पर्याय D हा भौतिकशास्त्र आहे. बरोबर उत्तर पर्याय (B) शांतात होते. यानंतर, दिवित गेम हरतो आणि नियमानुसार, त्याचा स्कोअर आता कमी होतो. स्कोअर कमी झाल्यामुळे त्याला 3,20,000 रुपये मिळतात. शो संपवताना, अमिताभ बच्चन यांनी सांगितलं केले की कदाचित पहिल्यांदाच त्यांनी पाहिलं आहे की शोमध्ये तज्ञांनी चुकीचे उत्तर दिलं आहे.

Web Title: Kaun Banega Crorepati Junior contestant Divit Bhargava lost game expert advivce goes wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.