KBC: फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले, आता हा शेतकरी बनणार का करोडपती?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 09:51 AM2020-12-03T09:51:20+5:302020-12-03T09:53:50+5:30
तेज बहादूर सिंह नावाच्या स्पर्धकाने जबरदस्त खेळ करत ५० लाख रूपये आपल्या नावावर केले आहेत.
कौन बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या मार्गावर आहे. आता एक शेतकऱ्याचा मुलगा केबीसीच्या हॉटसीटवर बसला आहे. तेज बहादूर सिंह नावाच्या स्पर्धकाने जबरदस्त खेळ करत ५० लाख रूपये आपल्या नावावर केले आहेत.
आधी २५ लाख आणि नंतर ५० लाख रूपये जिंकणाऱ्या तेज बहादूर सिंहला अमिताभ बच्चन १ कोटी रूपयांचा प्रश्न विचारणार इतक्यात हूटर वाजला. म्हणजे कार्यक्रमाची वेळ संपली. आता गुरूवारी हे कळेल की, तेज १ कोटी रूपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल की, नाही.
प्रोमोमध्ये तेज बहादूरचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्याने सांगितले की, कशाप्रकारे त्याच्या अभ्यासासाठी त्याच्या आईने कानातील सोन्याचे कुंडल गहाण ठेवले होते. त्याच्या आईच्या संघर्षामुळेच तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकला. तेज एक IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न बघत आहे. तो या शोमधून जेवढी रक्कम जिंकेल तो ते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावेल.
आपल्या या गोलकडे तो वेगाने पाउल सरकवत आहे. प्रोमोमध्ये बघायला मिळत आहे की, तेजने २५ लाख, ५० लाखाच्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आहेत. तेच त्याच्या समोर आता अमिताभ बच्चन यांनी १ कोटी रूपयांचा प्रश्न ठेवला. आता तो या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊ शकतो आणि चौथा करोडपती बनणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
तसा कौन बनेगा करोडपतीचा हा सीझन फारच चांगला झाला आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत तीन महिलांनी एक कोटी रूपये आपल्या नावावर केले आहेत. सर्वातआधी नाझिया नसीम यांनी हा कारनामा केला. नाझियानंतर आयपीएस अधिकारी मोहिता कुमार यांनी एक कोटी रूपयांच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत विजय मिळवला. मोहिता कुमारनंतर अनुपा दासने केबीसीमध्ये हा कमाल दाखवला. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत १ कोटी रूपये जिंकले.