मराठी अभिनेत्रीला शूटदरम्यान दुखापत, तरी पूर्ण केला सीन; Video शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 16:42 IST2023-11-07T16:41:39+5:302023-11-07T16:42:32+5:30
कितीही दुखापत झाली तरी तो सीन तिथे पूर्ण करावाच लागतो हेही तिने दाखवून दिलं.

मराठी अभिनेत्रीला शूटदरम्यान दुखापत, तरी पूर्ण केला सीन; Video शेअर करत दिली माहिती
टीव्ही असो किंवा सिनेमा कुठेही सीन शूट करताना काय मेहनत घ्यावी याची प्रेक्षकांना घरबसल्या कल्पनाही येऊ शकत नाही. अनेकदा चित्रीकरणादरम्यान स्टंट करावे लागतात आणि त्यात दुखापत होण्याची शक्यता असते. अशावेळी तो सीन पूर्ण करणंही तितकंच गरजेचं असतं. नुकतंच लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्रीला स्टंट करताना दुखापत झाली आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'काव्यांजली' मध्ये काव्या ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी (Kashmira Kulkarni) हिला स्टंट करताना दुखापत झाली आहेत. एका सीनमध्ये ती चालत असताना मागून टेम्पो येत असतो. तेवढ्यात तिला क्रेनच्या साहाय्याने वर उचलले जाते आणि टेम्पोवर ठेवले जाते. मात्र टेम्पोवर येत असतानाच तिच्या पायाला जोरात लागतं. याची झलक तिने व्हिडिओ पोस्ट करत दाखवली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले,'कितीही अडचणी आल्या तरी परफेक्ट सीन पूर्ण होईपर्यंत मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पडद्यामागे प्रत्येक जण मेहनत करत असतो....'
काव्याने या व्हिडिओतून शूटिंगदरम्यानची सर्व कसरत दाखवली आहे. कितीही दुखापत झाली तरी तो सीन तिथे पूर्ण करावाच लागतो हेही तिने दाखवून दिलं. काव्यांजली ही मालिका सुरु होऊन काहीच दिवस झाले असून मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.