KBC 11 : आठव्याच प्रश्नाला नापास झाले शिक्षक, जिंकायचे होते ७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:11 PM2019-10-07T15:11:13+5:302019-10-07T15:15:20+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या ११व्या सीझनमध्ये ७ कोटी जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकाला १० हजार रुपयांवर समाधान मानावं लागलं.

KBC 11: The eighth question was unsuccessful, the teacher wanted to win 2 crore | KBC 11 : आठव्याच प्रश्नाला नापास झाले शिक्षक, जिंकायचे होते ७ कोटी

KBC 11 : आठव्याच प्रश्नाला नापास झाले शिक्षक, जिंकायचे होते ७ कोटी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या ११व्या सीझनमध्ये ७ कोटी जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकाला १० हजार रुपयांवर समाधान मानावं लागलं. 

मध्यप्रदेशमधील भोपाळमधील सरकारी महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक अरूण मिश्रा यांनी कौन बनेगा करोडपतीच्या अकराव्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. ज्या सरकारी विद्यालयात शिकवतात आणि तिथल्या विद्यालयासाठी सोयीसुविधांसाठी ते खेळात जिंकलेल्या पैशांचा उपयोग करणार असल्याचं सांगितलं होतं.

इतकंच नाही तर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडमधील प्रश्नांची उत्तर देऊन जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्यासाठी शिक्षकाची निवड झाली त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र जनरल नॉलेजवर असणाऱ्या आठव्या प्रश्नावरच त्यांना खेळ सोडावा लागला आणि १० हजारांवर समाधान मानावं लागलं.


अरूण मिश्रा यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडमध्ये बाजी मारल्यानंतर धावत जाऊन अमिताभ बच्चन यांना मिठी मारली होती व म्हणाले होते की,'मला चंद्रयान माझ्या अंगावर उतरलंय का असं दोन क्षणांसाठी मला वाटलं', असं अमिताभ यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ दाखवला. या खेळात ७ कोटी जिंकले तर मी शाळाले देईन असं अरुण मिश्रा यांनी सांगितलं. त्यांची जिद्द पाहून अमिताभ यांनाही आशा वाटली मात्र त्यांना आठव्या प्रश्नावरच बाहेर पडावं लागलं.

Web Title: KBC 11: The eighth question was unsuccessful, the teacher wanted to win 2 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.