KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटी जिंकण्यात होणार का यशस्वी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 11:05 AM2020-11-06T11:05:06+5:302020-11-06T11:06:23+5:30
एक कोटी रुपये जिंकल्यानंतर नाझिया खेळ सोडू शकली असती मात्र प्रोमोमध्ये ती खेळ सोडत नसल्याचं दिसतं आहे.
करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. यंदाच्या १२ व्या सिझनलाही रसिकांची नेहमीच्या सिझनप्रमाणे भरघोस पसंती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नाझिया नसीम स्पर्धक सहभागी झाली. तिनं एक कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. हा सिझन सुरू झाल्यापासूनच कोणत्याच स्पर्धकांने कोटी रु. जिंकले नव्हते. नाझिया मात्र यंदाची सिझनची पहिली स्पर्धक करोडपती ठरली आहे.
या एपिसोडचे प्रोमोही टीव्हीवर झळकू लागले आहेत. प्रोमोत दाखवल्याप्रमाणे केबीसी 12 च्या प्रोमोमध्ये नाझिया एक कोटी रुपये जिंकल्याचं दाखवण्यात आलं आहे. नाझियाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर नाझिया खेळ सोडू शकली असती मात्र प्रोमोमध्ये ती खेळ सोडत नसल्याचं दिसतं आहे. कारण अमिताभ तिला सात कोटींचा सोळावा प्रश्न विचारताना दिसत आहेत. नाझियादेखील हे आव्हान स्वीकारते. त्यामुळे नक्कीच येणा-या भागात नाझिया कितपत आपली खेळी यशस्वी करते याचीच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
'कौन बनेगा करोडपती'च्या गुरूवारी झालेल्या एपिसोडमध्ये गुंजन लता या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांनी खेळ फारच शानदार पद्धतीने खेळला. त्यांनी त्यांची पहिली लाइफलाईन २० हजार रूपयांच्या प्रश्नावर घेतली होती. ३ लाख २० हजार रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी दोन लाइफलाईन वापरल्या. गुंजन यांनी ६ लाख ४० हजार रूपयांच्या प्रश्नावर आणखी एका लाइफलाईनचा वापर केला. प्रश्न होता - तानसेन व्यतिरिक्त यातील कुणाला स्वामी हरिदास यांचे शिष्य मानलं जातं? पर्याय होते - सनातन गोस्वामी, विद्यापति, चंडीदास, बैजनाथ मिश्र. बरोबर उत्तर होतं - बैजनाथ मिश्र.
अमिताभ यांनी त्या रागात असल्याचे समजताच कारण विचारले तर या गोष्टीला कारणीभूत शाहरुख खान होता. वास्तविक, रेखा राणी ही शाहरुख खानची मोठी चाहती आहे आणि अमिताभ यांनी एका चित्रपटामध्ये शाहरुखला फटकारले होते. चित्रपटात शाहरूखला अमिताभ यांचे असे वागणे आवडले नाही. म्हणून त्या अमिताभ यांच्यावर प्रचंड चिडल्या होत्या. वाचून थोडे आश्वचर्य वाटलेच असणार पण शेवटी बादशाह किंग खानची चाहती होती.