KBC 12: पहिल्यांदाच शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी अशा रितीने सांभाळला शो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:36 PM2021-01-06T13:36:35+5:302021-01-06T13:37:08+5:30
बिग बींचा खास अंदाज आणि शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत.
छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' हा शो आणि महानायक अमिताभ बच्चन हे जणू समीकरण; होस्ट म्हणून बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोला नवी ओळख मिळवून दिली. प्रश्नोत्तरे अशा स्वरुपात असलेल्या या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधत कौन बनेगा करोडपती शोला नवं परिमाण मिळवून दिलं आहे. बिग बींचा खास अंदाज आणि शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत.
भारतीय टीव्हीच्या इतिहासामधील सगळ्यात यशस्वी कार्यक्रम म्हणून कौन बनेगा करोडपती नावारुपाला आला. शोमध्ये स्पर्धकांना अडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळवून देण्यासाठी एक्सपर्ट अॅडव्हाइस असा एक पर्याय असतो. एरव्ही एक्सपर्स जेव्हा येतात तेव्हा त्वरित उत्तर देत स्पर्धकाला जिंकवून देतात.
मात्र पहिल्यांदाच शोमध्ये असे घडले की, मदतीसाठी आलेला एक्सपर्टचा आवाज तांत्रिक अडचणींमुळे ऐकु येत नव्हता. हॉटसीटवर यावेळी विवेक कुमार होते. एक्सपर्टला अमिताभ यांचाच आवाज येत होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी पुढाकार घेवून इशां-यांनी पर्याय नंबर सुचवायला सांगितला अशा रितीने खुद्द अमिताभ यांनी शोमध्येच आलेल्या तांत्रिक अडचणीवरही मात करत शो सुरळीत पार पडला.
या कार्यक्रमात स्पर्धकाने जिंकलेली सगळी रक्कम त्याला मिळते का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल ना.स्पर्धकाने जिंकलेल्या पैशातून कराची रक्कम कापली जाते आणि उर्वरित रक्कम स्पर्धकाला दिली जाते. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात एक कोटी रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकाला एकूण रकमेच्या ३० टक्के म्हणजे ३० लाख रुपये कर भरावा लागतो.
तसेच ३० लाखांवर १० टक्के सरचार्ज म्हणजे तीन लाख रुपये द्यावे लागतात. तसंच ३० लाखांवर चार टक्के सेस द्यावा लागतो तो एक लाख वीस हजार रुपये होतो. म्हणजे केबीसीत एक कोटी रुपये जिंकणारा स्पर्धक ३४.२ लाख रुपयांचा कर भरून सुमारे ६५ लाख रुपये घरी घेऊन जातो.