KBC 14: 75 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का बरोबर उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 11:28 AM2022-09-02T11:28:50+5:302022-09-02T11:29:16+5:30

Kaun Banega Crorepati: कोमलने सांगितलं की, तिचे वडीलच तिला आखाड्यात घेऊन गेले होते आणि आता ती यात तरबेज झाली आहे. इतकंच नाही तर तिने नॅशनल लेव्हलवरही मेडल मिळवले आहेत. 

KBC 14 : Contestnat unable to give right answer of 75 lakhs, quits game do you know answer | KBC 14: 75 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का बरोबर उत्तर?

KBC 14: 75 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का बरोबर उत्तर?

googlenewsNext

Kaun Banega Crorepati: रिअॅलिटी क्वीज शो 'कौन बनेगा करोडपती'च्या 14 व्या सीझनमधील लेटेस्ट व्हिडीओमध्ये रोल ओवर कंटेस्टंट कोमल गुप्ता होती. कोमलने शोमध्ये सांगितलं की, ती वेट लिफ्टिंग करते आणि त्यावेळी ती केवळ 11 वर्षांची होती. जेव्हा ती आखाड्यात गेली होती. तिने तिचे वडील तिची प्रेरणा असल्याचं सांगितलं. कोमलने सांगितलं की, तिचे वडीलच तिला आखाड्यात घेऊन गेले होते आणि आता ती यात तरबेज झाली आहे. इतकंच नाही तर तिने नॅशनल लेव्हलवरही मेडल मिळवले आहेत. 

खेळ सोडला

हॉट सीट पोहोचलेल्या कोमलने शोमध्ये 50 लाख रूपये जिंकले. पण ती 75 लाख रूपयांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. त्यामुळे तिने 50 लाख रूपये जिंकून शो सोडला. ज्या प्रश्नाचं उत्तर तिला आलं नाही तो प्रश्न काय होता हे जाणून घेऊ...तसेच त्याचं उत्तरही जाणून घेऊ.

काय होता प्रश्न?

75 लाख रूपयांसाठी कोमल गुप्ताला प्रश्न विचारण्यात आला होता की, 1973 मध्ये अराबेला आणि अनीटा नावाचे दोन जीव, अंतराळात काय करणारे पहिले जीव ठरले? या प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय होते A. घरटं बनवणं B. जाळ तयार करणं C. पंखांद्वारे उडणं D. जन्म देणे

नव्हती कोणतीही लाइफलाईन

कोमलला या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं आणि ना तिच्याकडे कोणतीही लाइफलाईन शिल्लक होती. त्यामुळे तिने रिस्क न घेता. शो क्वीट करण्याचा निर्णय घेतला. पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं B. जाळं तयार करणं.

Web Title: KBC 14 : Contestnat unable to give right answer of 75 lakhs, quits game do you know answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.