KBC 15 : ८० हजारांसाठी वर्ल्डकप २०२३चा प्रश्न, लाइफलाइन असूनही देता आलं नाही अचूक उत्तर, सोडावा लागला खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 06:08 PM2023-10-07T18:08:26+5:302023-10-07T18:09:01+5:30

एका स्पर्धकाला वर्ल्डकपच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने लवकर खेळ सोडावा लागला.

KBC 15 contestant failed to give world cup 2023 answer question asked for 80 thousands | KBC 15 : ८० हजारांसाठी वर्ल्डकप २०२३चा प्रश्न, लाइफलाइन असूनही देता आलं नाही अचूक उत्तर, सोडावा लागला खेळ

KBC 15 : ८० हजारांसाठी वर्ल्डकप २०२३चा प्रश्न, लाइफलाइन असूनही देता आलं नाही अचूक उत्तर, सोडावा लागला खेळ

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचं नवं पर्व काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सामान्य व्यक्तींना या शोमध्ये काही प्रश्नांची उत्तरं देऊन कोट्यधीश होण्याची संधी मिळते. पण, केबीसीच्या हॉट सीटवर बसल्यावर भल्याभल्यांची दांडी गुल होते. 

या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात एका स्पर्धकाला वर्ल्डकपच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने लवकर खेळ सोडावा लागला. हरियाणाच्या साक्षी केबीसीच्या हॉट सीटवर बसल्या होत्या. खेळ सुरू झाल्यावर एकामागोमाग एक प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्या उत्तम खेळत होत्या. यामध्ये दोन लाइफलाइन त्यांनी वापरली होती. पण, वर्ल्डकपबद्दल विचारलेल्या एका प्रश्नामुळे त्यांना अर्धवटच खेळ सोडावा लागला. 

साक्षी यांना ८० हजारांसाठी वर्ल्डकपबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी खूप वेळ घेतला. पण, उत्तर चुकल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला. 

२०२३ आयसीसी क्रिकेट विश्व कपच्या गाण्याचं शीर्षक काय आहे? 
A. दिल जश्न बोले
B. खेल जिन्दगी का
C. कप ही मंजिल
D. जीत कर मानेंगे

८० हजारांसाठी विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचं D.जीत कर मानेंगे हे अचूक उत्तर होतं. पण साक्षी यांनी A.दिल जश्न बोले हे उत्तर दिलं होतं. लाइफलाइन असूनही त्यांनी त्याचा वापर न करताच उत्तर दिलं. चुकीच्या उत्तरामुळे साक्षी केबीसीमध्ये जास्त रक्कम जिंकू शकल्या नाहीत. 

Web Title: KBC 15 contestant failed to give world cup 2023 answer question asked for 80 thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.