ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:48 AM2024-08-28T10:48:22+5:302024-08-28T10:49:58+5:30

KBC 16 च्या मंचावर ई रिक्षा चालवणारा अन् ब्रेन ट्यूमरने त्रस्त असलेला एक माणूस सहभागी झाला. या माणसाच्या उपचारांचा खर्च बिग बींनी उचलला आहे (kbc 16, amitabh bachchan)

kbc 16 contestant riksha driver parasmani inspiring story amitabh bachchan | ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर?

ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 16 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या अफलातून शैलीत KBC 16 चं होस्टिंग करत आहेत. KBC 16 च्या मंचावर विविध स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत. KBC 16 च्या मंचावर एक स्पर्धक सहभागी झाला जो ब्रेन ट्यूमरने ग्रस्त आहे. गेली २० वर्ष हा स्पर्धक 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु वेळोवेळी त्याला हुलकावणी मिळत गेली. या स्पर्धकाचं नाव पारसमणी. पारसमणींची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे यात शंका नाही.

अशी आहे पारसमणींची कहाणी

बिहारमधील मुझफ्फरनगरमध्ये ई-रिक्षा चालवणारे पारसमणी दिवसाला ५०० ते ७०० रुपये कमावतात. २००८ ला पारसमणींना ब्रेन ट्यूमरचं निदान झालं. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या ट्यूमवरवर उपचार सुरु आहेत. रिक्षा चालवून पारसमणी कुटुंबाचं पालनपोषण करत असतात. पारसमणी गेल्या २० वर्षांपासून KBC मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण त्यांना सहभाग घेता आला नाही. अखेर यंदाच्या KBC 16 मध्ये पारसमणींना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं कर १२ लाख ५० हजारपर्यंत मजल मारली. पारसमणी यांची कहाणी ऐकून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या उपचारांचा खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


या प्रश्नावर पारसमणींनी सोडला खेळ

पारसमणींनी हुशारीच्या जोरावर KBC 16 मध्ये १२ लाख ५० हजारपर्यंत मजल मारली.  परंतु त्यांना २५ लाखांच्या प्रश्नांचं उत्तर देता आलं नाही.  २५ लाखांचा प्रश्न असा होता की, 'किस लेखक ने महात्मा गांधी पर किताब लिखी, जो कभी उनसे मिले नहीं थे'. या प्रश्नाचं उत्तर होतं रोमन रोलॉंड. पारसमणींना ठोस उत्तर माहित नसल्याने त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. कठीण परिस्थितीवर मात करुनही माणसाला कसं यशस्वी होता येतं, याचं उदाहरण म्हणजे पारसमणी.

Web Title: kbc 16 contestant riksha driver parasmani inspiring story amitabh bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.