KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:21 PM2024-11-02T14:21:19+5:302024-11-02T14:21:39+5:30

KBC 16 मध्ये विचारलेल्या शूद्रक लिखित 'मृच्छकटिक' नाटकासंबंधीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

KBC 16 question asked about natak mruchakatik by kavi shudrak amitabh bachchan | KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या खास शैलीत KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. KBC 16 मध्ये विविध कौटुंबिक, सामाजिक बॅकग्राऊंडमधून आलेले स्पर्धक सहभागी आहेत. KBC 16 मधील स्पर्धकांना कंफर्टेबल करण्याचं महत्वाचं काम अमिताभ बच्चन करताना दिसतात. अमिताभ यांच्यासमोर बसण्याचं दडपण स्पर्धकांना असणारच. परंतु बिग बी त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे हे दडपण दूर करण्याचं काम करतात. अशातच KBC 16 मध्ये एका स्पर्धकाला 'मृच्छकटिक' नाटकाविषयीच्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. काय होता तो प्रश्न?

KBC 16 मध्ये विचारण्यात आला मृच्छकटिक नाटकाविषयीचा प्रश्न

'कौन बनेगा करोडपती'च्या १६ व्या सीझनमध्ये नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात अनुश्री नावाची स्पर्धक सहभागी झाली होती. अनुश्रीने हुशारीच्या जोरावर ६ लाख ४० हजार ही रक्कम जिंकली. पण पुढे १२ लाख ८० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर तिला देता नाही आलं. हा प्रश्न होता की, 

संस्कृत नाटक ‘मृच्छकटिक’ किस नगर में आधारित है?

A. काशी
B. उज्जैन
C. मथुरा
D. तक्षशिला


काय होतं या प्रश्नाचं उत्तर?

अनुश्रीने या प्रश्नाचं उत्तर  माहित नसल्याने तिने खेळ सोडला. या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन B. उज्जैनअनुश्रीने ६ लाख ४० हजाराची रक्कम घेऊन खेळ सोडला. अनुश्री जिंकलेली रक्कम तिच्या वडिलांना देणार आहे. २०१३ साली अनुश्रीच्या वडिलांनी कॅन्सरवर मात केली. त्यावेळी अनुश्री आणि तिच्या कुटुंबाने खूप वाईट काळ बघितला. त्यामुळे जिंकलेली रक्कम भविष्यासाठी अनुश्री राखून ठेवणार असल्याचं ती म्हणाली. 

Web Title: KBC 16 question asked about natak mruchakatik by kavi shudrak amitabh bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.