KBC: १ कोटी रूपयांसाठीच्या मुख्यमंत्र्यासंबंधी प्रश्नावर क्विट केला त्याने शो, बघा तुम्हाला येतंय का उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 08:54 AM2020-12-11T08:54:15+5:302020-12-11T08:56:17+5:30
विजय पालला इतकं पुढे आल्यावर आणि इतकी रक्कम जिंकल्यावर मागे येणं योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्याने १ कोटी रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला.
कौन बनेगा करोडपतीच्या गुरूवारच्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बुधवारचा रोलओवर स्पर्धक विजय पाल सिंह बसलला होता. मध्य प्रदेशातील एका छोटया गावात विजयपाल कुरिअर बॉयचं काम करतो आणि ८ हजार रूपये महिना पगार मिळवतो. विजय पालने गुरूवारी १ कोटी रूपयांच्या प्रश्नाचा सामना केला. पण तो या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊ शकत नाही.
विजय पालला इतकं पुढे आल्यावर आणि इतकी रक्कम जिंकल्यावर मागे येणं योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्याने १ कोटी रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला. आणि ५० लाख रूपय जिंकून परतला. पण त्याला १ कोटी रूपयांचा असा प्रश्न विचारण्यात आला होता की, तो उत्तर देऊ शकला नाही. (KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर)
काय होता प्रश्न?
- शोभाराम कुमावत राजस्थान राज्याच्या सुरूवातीच्या काळातील कोणत्या संक्षिप्त कालीन संघाचे एकमेव मुख्यमंत्री बनले होते?
(ए).वृहद् राजस्थान (बी).राजस्थान संघ (सी).मत्स्य संघ (डी).संयुक्त राजस्थान संघ
Our hotseat contestant VIJAY PAL SINGH RATHORE is a man of many dreams. Will he correctly answer #SawaalEkCroreKa? Watch his amazing gameplay tonight at 9PM on #KBC12. @SrBachchan@SPNStudioNEXTpic.twitter.com/wgr5kQsoD8
— sonytv (@SonyTV) December 10, 2020
सुरूवातीपासूनच समजदारीचा खेळ खेळत असलेल्या विजय पालच्या सर्व लाइफलाईन या प्रश्नापर्यंत संपल्या होत्या. या प्रश्नावर बराचवेळ विचार केल्यानंतर त्याने शो क्विट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमिताभ बच्च यांनी त्याला एक उत्तर गेस करायला सांगितलं आणि त्याने पर्याय ए लॉक करायला सांगितला. (KBC: 'या' जीवाचा फोटो ओळखू शकला नाही स्पर्धक, २५ लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो....)
हे उत्तर बरोबर नव्हतं आणि खेळ सोडल्यावर अमिताभ बच्चन यांनी विजय पाल सिंह याला बरोबर उत्तर सांगितलं. ते होतं पर्याय सी म्हणजे मस्त्य संघ. अमिताभ बच्चन हे विजय पालच्या खेळाने चांगलेच प्रभावित दिसले.