KBC: १२ लाख ५० हजारांच्या गणितासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला येतं का उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 09:52 AM2020-12-31T09:52:52+5:302020-12-31T09:54:27+5:30
अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला या १२व्या प्रश्नात मार्च महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या दिवसाबाबत विचारण्यात आले.
'कौन बनेगा करोडपती' चे यावेळचे अनेक एपिसोड चांगलेच गाजले. यावेळी तीन महिलांनी एक कोटी इतकी रक्कम जिंकली. तर अनेकांनी शो क्विट करत जिंकलेली रक्कम घरी नेली. एका लेटेस्ट एपिसोडमध्ये गणितासंबंधी एक प्रश्न स्पर्धक नेहा राठीसाठी अडचणीचा ठरला. अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला या १२व्या प्रश्नात मार्च महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या दिवसाबाबत विचारण्यात आले.
नेहा राठी यांनी ११व्या प्रश्नाचं उत्तर देऊन ६ लाख ४० हजार रूपये आधीच जिंकले होते. या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या सर्व लाइफलाईनही संपल्या होत्या. समोर होता १२ लाख ५० हजार रूपयांचा प्रश्न आणि त्यांच्याकडे एकही लाइफलाईन शिल्लक नव्हती. त्यामुळे नेहा यांनी खेळ क्विट करण्याचा निर्णय घेतला.
काय होता प्रश्न?
14 मार्चला याती कोणता दिवस साजरा केला जातो?
A- मोल दिवस
B- पाई दिवस
C- पाइथागोरस प्रमेय दिवस
D- फिबोनाची दिवस
या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं पाई दिवस. शोदरम्यान नेहाने तिच्या लाइफबाबतही अमिताभ बच्चन यांच्यासोबत गप्पा केल्या. नेहाने यावेळी सांगितले की ती फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न करणार आहे.