KBC - कोट्यधीश बनण्यापासून केवळ १ पाऊल दूर; हॉट सीटवरील 'ही' महिला स्पर्धक कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:39 PM2022-11-23T13:39:48+5:302022-11-23T13:47:41+5:30
अलीकडेच केबीसीवर कार्तिक आर्यनसारखा हुबेहुब दिसणारा स्पर्धक पोहचला होता. त्याला पाहून अमिताभ बच्चनही हैराण झाले होते.
मुंबई - टेलिव्हिजनमधील मोस्ट पॉप्युलर क्विज शो कौन बनेगा करोडपती दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. केबीसीचा प्रत्येक भाग पाहण्यासाठी चाहता आतुरतेने प्रतिक्षा करत असतो. या व्यासपीठानं आतापर्यंत अनेक लोकांची स्वप्न सत्यात उतरवली आहेत. आता आगामी एपिसोडमध्ये असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. केबीसीचा नवा प्रोमो आला आहे. या प्रोमोत स्पर्धक सोनू भारती स्वत:ला मोटिवेट करताना दिसून येतेय.
हॉट सीटवर बसलेली महिला कोण?
कोन बनेगा करोडपती या शोच्या नवीन प्रोमोनं चाहत्यांची उत्सुकता ताणून ठेवली आहे. प्रोमोत अमिताभ बच्चन हे समोर बसलेल्या स्पर्धकावर नजर ठेवून आहेत. या स्पर्धकाचं नाव सोनू भारती असं आहे. जी राजस्थानच्या सरकारी बँकेत हेड कॅशियर म्हणून कामाला आहे. केबीसीच्या मंचावर सोनू भारतीने ५० लाख रुपये जिंकले आहेत. ५० लाख जिंकल्यानंतर सोनू भारती यांच्यासमोर ७५ लाखांसाठी प्रश्न विचारण्यात आला आहे. मात्र त्याचं योग्य उत्तर देण्याआधी स्पर्धक टेन्शनमध्ये दिसून येत आहे.
अमिताभ बच्चन स्पर्धकाला सांगतायेत, हिंट आम्ही वारंवार देत असतो की आता लाईफलाईन नाही. अमिताभचं हे वाक्य ऐकून सोनू भारती स्वत:ला मोटिवेट करत असते. थोडा आणखी विचार कर, थोडा आणखी विचार कर असं ती म्हणतेय. सोनू भारती स्वत:ला मोटिवेट करून करोडपती शोमध्ये कोट्यवधी रुपये जिंकण्यासाठी इच्छुक आहे. सोनू भारती स्वत:ला मोटिवेट करताना पाहून अमिताभ बच्चन हेदेखील सरप्राइज होतात. प्रोमोत त्यांच्या देहबोलीवरून ते सोनू भारतीच्या खेळाने प्रभावित झाल्याचं दिसून येते.
आता हे पाहणं गरजेचे आहे की, सोनू भारती कौन बनेगा करोडपती मंचावर १ कोटी रुपये बक्षीस जिंकतेय की त्यांना ५० लाख रुपयांवर समाधान मानावं लागतंय. कौन बनेगा करोडपतीचा हा १४ वा सीझन आहे. शोची उत्सुकता वाढवण्यासाठी अमिताभ बच्चन प्रत्येक दिवशी स्पर्धकांचे किस्से-कहाणी ऐकवतात. अलीकडेच केबीसीवर कार्तिक आर्यनसारखा हुबेहुब दिसणारा स्पर्धक पोहचला होता. त्याला पाहून अमिताभ बच्चनही हैराण झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"