Ketki Dave: आयुष्यात सगळं काही आहे पण तो नाही..., पतीच्या निधनाने कोलमडली केतकी दवे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:37 AM2022-07-31T10:37:27+5:302022-07-31T10:41:07+5:30

Rasik Dave Death: लोकप्रिय अभिनेते रसिक दवे यांचं 29 जुलैला निधन झालं. रसिक दवे यांची पत्नी व अभिनेत्री केतकी दवे हिची अवस्थाही वाईट आहे. तिचे अश्रू थांबत नाहीयेत...

ketki dave disclosed about late husband rasik dave | Ketki Dave: आयुष्यात सगळं काही आहे पण तो नाही..., पतीच्या निधनाने कोलमडली केतकी दवे

Ketki Dave: आयुष्यात सगळं काही आहे पण तो नाही..., पतीच्या निधनाने कोलमडली केतकी दवे

googlenewsNext

लोकप्रिय अभिनेते रसिक दवे (Rasik Dave ) यांचं 29 जुलैला निधन झालं. रसिक दवे सारखा हरहुन्नरी अभिनेता गमावल्यानं मनोरंजन विश्वासवर शोककळा पसरली आहे. रसिक दवे यांची पत्नी व अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) हिची अवस्थाही वाईट आहे. तिचे अश्रू थांबत नाहीयेत. गेल्या काही वर्षांपासून रसिक दवे किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. 

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केतकी दवे बोलली. ती म्हणाली, रसिक कधीही आपल्या आजारपणाबद्दल बोलत नव्हते. त्यांना ते आवडायचे नाही. ते फारच प्रायव्हेट पर्सन होते. सगळं काही ठीक होईल, असं ते म्हणतं. पण आम्हाला ठाऊक होतं, ते ठीक नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच ते मला म्हणाले होते की, काहीही झालं तरी काम सोडू नकोस. ते करत नाही. मी सध्या काम करण्याच्या मन:स्थितीत नाही, असं मी त्यांना म्हणायचे. पण त्यांच्या मते, शो मस्ट गो ऑन. मला ते काम करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. सगळं काही नीट होईल, आशा सोडू नकोस, असं ते मला समजावते. आज माझ्यासोबत माझं कुटुंब आहे. माझी आई, माझी मुलं, माझी सासू... सगळे माझी सपोर्ट सिस्टिम आहेत. पण माझा नवरा माझ्यासोबत नाही. मी त्याला मिस करतेय. आयुष्य आता आधीसारखं राहिलेलं नाही. सगळं आहे पण तो माझ्यासोबत नाही...

केतकी व रसिक दवे यांची पहिली भेट 1979 साली एका नाटकाच्या सेटवर झाली होती. पहिल्याच नजरेत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी अनेक नाटकात व मालिकांमध्ये एकत्र काम केलं आणि दोघं पे्रेमात पडले. 1983 साली दोघांनी लग्न केलं होतं.

Web Title: ketki dave disclosed about late husband rasik dave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.