'बिग बॉस १७'मध्ये पार पडलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 06:44 PM2023-12-17T18:44:35+5:302023-12-17T18:46:37+5:30

बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर पडला आहे. 

Khanzaadi was eliminated in the latest Weekend Ka Vaar episode with Salman Khan | 'बिग बॉस १७'मध्ये पार पडलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला

'बिग बॉस १७'मध्ये पार पडलं एलिमिनेशन; 'या' स्पर्धकाचा प्रवास थांबला

'बिग बॉस १७' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर पडला आहे. 

प्रसिद्ध रॅपर-गायिका फिरोजा खान उर्फ ​​खानजादी ही 'बिग बॉस 17' च्या घरातून बाहेर पडली आहे. या आठवड्यात,  नील भट्ट, विकी जैन, खानझादी आणि अभिषेक कुमार हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. अखेर खानजादी शोमधून बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या घरात खानजादी आणि अभिषेक यांच्यात चांगली बॉन्डिंग पाहायला मिळत होते. 

खानझादीने बाहेर आल्यानंतर आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, "मला बाहेर येण्याची इच्छा होती. प्रबळ इच्छाशक्तीने मी आत गेले. पण काही काळानंतर मला तेथील रस कमी झाला आणि मला घरातून पळून जावेसे वाटले. तिथे माझ्या शारीरिक आरोग्याबद्दल चर्चा झाली आणि चेष्टा केली गेली'. तसेच अंकिता लोखंडे, विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांच्यापैकी एक जण हा शो जिंकू शकतो, असेही तिने सांगितले.  

 गायक-रॅपर असलेली खानजादी ही आसामची रहिवासी आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिचे वडील अफगाणिस्तानचे तर आई भारतीय आहे. तिला लहानपणापासूनच गाणी लिहिण्याची आवड होती. तिने 'आझादी', 'नो बाउंड्रीज' आणि 'तराजू' या गाण्यातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

Web Title: Khanzaadi was eliminated in the latest Weekend Ka Vaar episode with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.