'हे बिग बॉस नाही भावा'; शिवला अवघड स्टंट करताना पाहून अर्चना गौतमने उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:06 IST2023-07-05T15:06:29+5:302023-07-05T15:06:56+5:30
khatron ke khiladi 13: प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शिव ठाकरे अवघड स्टंट करताना दिसत आहे.

'हे बिग बॉस नाही भावा'; शिवला अवघड स्टंट करताना पाहून अर्चना गौतमने उडवली खिल्ली
रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १३ (Khatron Ke Khiladi Season 13) चा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात खटके उडाल्याचं दिसून येत आहे. बिग बॉस १६ च्या घरात एकत्र असतानाही या दोघांमध्ये खटके उडायचे. तेच मतभेद आता खतरों के खिलाडीमध्येही पाहायला मिळत आहेत. या शोच्या नवीन प्रोमोमध्ये देखील त्यांच्यातील मैत्रीपूर्ण वाद दिसून येत आहे.
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) अवघड अवघड स्टंट करताना दिसत आहे. कधी विजेच्या चालू तारेला हात लावणं, कधी पाण्यात उडी मारणं असे स्टंट करत आहेत. यात त्याचे प्रयत्न पाहून प्रत्येक स्पर्धक श्वास रोखून त्याच्याकडे पाहात असतो. तर, यामध्येही अर्चना गौतम त्याला टोमणा मारते. बिग बॉस आहे असं समजलास का? असा खोचक प्रश्न ती शिवला विचारते.
Rohit Shetty’s Khatron Ke Khiladi 13 will begin airing from 15th July every Saturday and Sunday at 9:00 PM only on COLORS! #KhatronKeKhiladi13pic.twitter.com/YfNVOBjzCi
— News18 Showsha (@News18Showsha) July 4, 2023
अर्चना आणि शिव यांच्यातील मतभेद, वाद कायमच चर्चेत येत असतात. हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, तरीही ते एकमेकांची मस्करी करत असतात. याविषयी अर्चनाने एका मुलाखतीमध्येही भाष्य केलं होतं. "भांडणं काय होतच राहतात. पण, जर स्टंट किंवा टास्क करताना त्याला कुठे दुखलं-खुपलं तर मलाही वाईट वाटतं. तो माझ्याविषयी चुकीचं बोलला, माझ्या आईवर भाष्य केलं हे मला खरंच आवडलं नाही. पण आता या गोष्टी जुन्या झाल्या. रोहित सरांमुळे आमच्यात मैत्री झाली आहे", असं आकांक्षा म्हणाली.
प्रदर्शित झालेला प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्येच स्पर्धकांनी या शोचं चित्रीकरण पूर्ण केलं असून आता ते भारतामध्ये परतत आहेत. त्यामुळे हा शो सातत्याने चर्चेत येत आहे. हा शो येत्या १५ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.