Nyrraa Banerjee : 'खतरों के खिलाडी 13' मध्ये नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत; शेअर केलेला फोटो पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 10:23 IST2023-06-11T09:58:26+5:302023-06-11T10:23:45+5:30
Nyrraa Banerjee Injured: नायरा एम बॅनर्जीने पाण्यामध्ये एक स्टंट केला होता. यादरम्यान तिला दुखापत झाली.

Nyrraa Banerjee : 'खतरों के खिलाडी 13' मध्ये नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत; शेअर केलेला फोटो पाहून बसेल धक्का
'खतरों के खिलाडी सीझन 13' चं शूटिंग केप टाऊनमध्ये सुरू आहे. याच दरम्यान रोहित शेट्टी सर्व स्पर्धकांना एकाहून एक साहसी स्टंट करायला लावत आहे. वेगवेगळ्या गोष्टी करताना स्पर्धकांना नाकी नऊ येत आहेत. गंभीर जखमा होत आहेत. रोहित रॉय दुखापतीमुळे मुंबईत परतला आहे. ऐश्वर्या शर्मा, अरिजित तनेजा यांच्यानंतर आता नायरा बॅनर्जीही जखमी झाली आहे. तिने फोटो शेअर केला आहे.
नायरा एम बॅनर्जीने पाण्यामध्ये एक स्टंट केला होता. यादरम्यान तिला दुखापत झाली. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, नायरा बोटीवर होती आणि स्टंटसाठी तिला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावं लागलं. पण हे करताना अनेक अडथळे आले, जे तिला पार करावे लागले. यावेळी तिने कोणतेही सेफ्टी पॅड घातले नव्हते. लांब मोजे किंवा गुडघ्यावर कोणताही बँड नव्हता. परिणामी, तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि अभिनेत्रीने त्या जखमेचा फोटो शेअर केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, इतकी दुखापत होऊनही नायरा बॅनर्जीने स्टंट रद्द केला नाही. तिने तो स्टंट पूर्ण केला आणि सर्वांची वाहवा मिळवली. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या दोन्ही पायांचे गुडघे लाल आणि थोडे काळे पडलेले दिसत आहेत. यासोबतच काही जखमा झाल्या असून त्यातून रक्त आलं आहे. तिने त्यावर मलम लावले असून आता त्या जखमा लवकर बऱ्या होत आहेत.
गेल्या महिन्यात, गुम है किसीके प्यार में अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला होता, ज्यामध्ये ती उदास चेहरा करताना दिसत होती. मिरर सेल्फीमध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. काही दिवसांपूर्वी अरिजित तनेजालाही किरकोळ दुखापत झाली होती. त्याने त्याच्या जखमी हाताचा फोटो शेअर केला ज्यामध्ये फोड आणि ओरखडे दिसत आहेत. 'दाग अच्छे हैं' अशा कॅप्शनसह त्याने ते अपलोड केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.