'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळा गश्मीर महाजनी? रोहित शेट्टीने दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:55 IST2024-04-17T15:52:01+5:302024-04-17T15:55:35+5:30
Khatron Ke Khiladi 14: रोहित शेट्टीच्या शोमध्ये स्टंट करताना दिसणार गश्मीर महाजनी?

'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळा गश्मीर महाजनी? रोहित शेट्टीने दिली ऑफर
'खतरों के खिलाडी' हा अनेक लोकप्रिय रिएलिटी शोपैकी एक आहे. रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभाग घेतात. गेल्या वर्षी 'खतरों के खिलाडी'मध्ये मराठमोळा शिव ठाकरे सहभागी झाला होता. यंदाही एक मराठमोळा चेहरा दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'खतरों के खिलाडी १४'मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खतरों के खिलाडीच्या टीमकडून गश्मीरला विचारणा झाली आहे. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गश्मीर आणि 'खतरों के खिलाडी'च्या मेकर्समध्ये बोलणीही झाली आहेत. त्यामुळे गश्मीर यंदाच्या 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, याबाबत अद्याप गश्मीर किंवा खतरों के खिलाडी टीमकडून कोणतीही अधिकृता माहिती देण्यात आलेली नाही. गश्मीर महाजनी जेव्हा झलक दिखला जामध्ये सहभागी झाला होता. तेव्हाच रोहित शेट्टीने त्यावा 'खतरो के खिलाडी' शोसाठी ऑफर दिली होती. परंतु, तेव्हा गश्मीरला या शोमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे आता पुन्हा त्याला या रिएलिटी शोसाठी विचारणा झाली आहे.
दरम्यान, 'खतरों के खिलाडी १४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये एल्विश यादव, मन्नारा चोप्रा, शोएब इब्राहिम, मनिषा रानी, अंकिता लोखंडे, नील भट्ट, जिया शंकर या कलाकरांच्या नावाची चर्चा आहे.