बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीला 'खतरो के खिलाडी'ची ऑफर? तर 'या' अभिनेत्याने दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:44 IST2025-04-04T16:43:24+5:302025-04-04T16:44:03+5:30

'खतरो के खिलाडी'चा १५ वा सीझन लवकरच सुरु होणार आहे.

khatron ke khiladi makers approach disha patani s sister khushboo patani to participate | बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीला 'खतरो के खिलाडी'ची ऑफर? तर 'या' अभिनेत्याने दिला नकार

बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीला 'खतरो के खिलाडी'ची ऑफर? तर 'या' अभिनेत्याने दिला नकार

'खतरो के खिलाडी' (Khatron ke Khiladi) रिएलिटी शोचा १५ वा सीझन लवकरच सुरु होणार आहे. रोहित शेट्टीच शो होस्ट करणार आहे. या पर्वात कोणकोणते सेलिब्रिटी असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत शोमध्ये सहभागी होणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीलाही शोची ऑफर मिळाली आहे. कोण आहे ती?

'इंडिया फोरम'च्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खूशबू पटानीला (Khushboo Patani) मेकर्सने ऑफर दिली आहे. खूशबू दिशाप्रमाणेच सुंदर आणि फीट आहे. अनेकदा दिशाच्या व्हिडिओ, फोटोमध्ये तिची झलक दिसते. तिने डेहराडूनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलं. इतकंच नाही तर ती भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर आहे. अशातच खुशबू शोमध्ये आली तर इतरांना तिची तगडी स्पर्धा असणार आहे. 

खुशबूशिवाय बिग बॉस १८ फेम चूम दरांग, दिग्विजय राठी, अविनाश मिश्रा आणि इशा सिंहलाही अप्रोच करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडिया सेन्सेशन ओरीलाही विचारणा झाली आहे. अद्याप मेकर्सकडून कोणाच्याही नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

'या' अभिनेत्याने नाकारली ऑफर?

'बिग बॉस १६' मध्ये सहभागी झालेला अंकिता गुप्ता सध्या अभिनेत्री प्रियंका चौधरीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दोघंही बिग बॉसमध्ये भेटले. ब्रेकअपच्या कारणामुळेच त्याने तिच्यासोबतचा 'तेरे हो जाये हम' शोला नकार दिला. तसंच मी यावेळी खतरो के खिलाडीही करणार नाही असं त्याने स्पष्ट केलं.

Web Title: khatron ke khiladi makers approach disha patani s sister khushboo patani to participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.