झी मराठीवर सुरु होतोय आणखी एक नवा कार्यक्रम, तब्बल १० वर्षानंतर 'खुपते तिथे गुप्ते' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 07:00 AM2023-04-29T07:00:00+5:302023-04-29T07:00:02+5:30

टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या नव्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. आता आणखी एक नवा कार्यक्रम येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

Khupte Tithe Gupte new marathi serial on zee marathi comming soon | झी मराठीवर सुरु होतोय आणखी एक नवा कार्यक्रम, तब्बल १० वर्षानंतर 'खुपते तिथे गुप्ते' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवर सुरु होतोय आणखी एक नवा कार्यक्रम, तब्बल १० वर्षानंतर 'खुपते तिथे गुप्ते' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक वाहिन्या नव्या नव्या मालिका घेऊन येत आहेत. आता आणखी एक नवा कार्यक्रम  येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, झी मराठी (Zee Marathi )या वाहिनीवर लवकरच एक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या काळात झी मराठीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नव्या मालिका सुरू होत आहेत आणि यात आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर पडणार आहे. 

पुन्हा एकदा झी मराठी बऱ्याच काळानंतर म्हणजेच जवळपास १० वर्षानंतर एक जबरदस्त व अफलातून कार्यक्रम भेटीस येणार आहे आणि तो बहूचर्चित कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. परत एकदा तो येणार आणि सगळ्यांची गुपित उलगडणार आहे.

नावावरून तर प्रेक्षकांच्या लक्षात आलच असेल की ती खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे ते आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके अवधूत गुप्ते. खुपते तिथे गुप्तेच हे पर्व सर्वार्थाने वेगळं असणार आहे कारण, या पर्वाच खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खास ‘खुर्ची’ हो खुर्ची जिच्यासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतेय, मग ते नॊकरीमध्ये असो, कॉर्पोरेट जग असो किंवा मग राजकारण. ही खुर्ची सर्वार्थानं वेगळी असणार आहे कारण, या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार आहेत त्यांना गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाही तर टोचणार आहेत. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येणार आहे. 

Web Title: Khupte Tithe Gupte new marathi serial on zee marathi comming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.