Khushaboo Tawde : मराठमोळी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:43 IST2024-08-14T18:42:56+5:302024-08-14T18:43:42+5:30
Khushaboo Tawde : खुशबू तावडे आणि संग्राम साळवी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. त्या दोघांना तीन वर्षांचा मुलगा आहे, ज्याचं नाव आहे राघव. त्याचा जन्म २ नोव्हेंबर, २०२१ मध्ये झाला. आता हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

Khushaboo Tawde : मराठमोळी अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बंप
अभिनेत्री खुशबू तावडे (Khushaboo Tawde) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी (Sara Kahi Tichyasathi) मालिकेत उमाच्या भूमिकेत पाहायला मिळत होती. मात्र आता तिने या मालिकेतून निरोप घेतला आहे. त्याचे कारण देखील समोर आले आहे. ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिने मालिकेला रामराम केला आहे. खुशबू दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिला आणि संग्राम साळवी(Sangram Salvi)ला तीन वर्षांचा मुलगा आहे, ज्याचे नाव आहे राघव. नुकतेच खुशबूने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करणारा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री खुशबू तावडे हिने इंस्टाग्रामवर राघवसोबतचा फोटो शेअर केला आहे. यो फोटोत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रेम बहुगुणित झाले. तुमच्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी कृतज्ञ! हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
खुशबू तावडे आणि संग्राम साळवी हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्या दोघांनी २०१८ साली लग्न केले. त्या दोघांना तीन वर्षांचा मुलगा आहे, ज्याचं नाव आहे राघव. त्याचा जन्म २ नोव्हेंबर, २०२१ मध्ये झाला. आता हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
पल्लवी वैद्यबद्दल
सारं काही तिच्यासाठी मालिकेत उमाईच्या भूमिकेत खुशबू तावडेच्या जागी आता पल्लवी वैद्य पाहायला मिळणार आहे. पल्लवीने ‘अग्गंबाई अरेच्चा!’ या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘अजुनही बरसात आहे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने काम केले आहे. तसेच गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातही तिने काम केले आहे. शेवटची ती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करताना दिसली होती.