किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:12 IST2024-06-10T17:11:00+5:302024-06-10T17:12:00+5:30
'Drama Juniors' Show :'ड्रामा ज्युनियर्स' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर दाखल होणार आहे.

किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर!
झी मराठीवर ३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचे अपहरण झाले. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले. तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा कारनामा केला होता छोट्या बच्चे कंपनीने.
आता ही लहान मुले आणखी काय ड्रामा करणार हे लवकरच कळेल. पण या शोच्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर हे ह्या रिएलिटी शो चे परीक्षक असणार आहेत तर सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. 'ड्रामा ज्युनियर्स' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर दाखल होणार आहे.
अमृता खानविलकर या शोबद्दल म्हणाली की, "खरंतर या शो साठी मी खूप उत्सुक आहे आणि एवढ्या लहान कलाकारांना जज करणं माझ्यासाठी आव्हान आहे. आजवर अनेक शोसाठी जज झाले आहे पण हा कार्यक्रम खूप खास आहे. लहान मुलांसोबत दंगा करायला मज्जा येणार आहे आणि अजून गंमतजंमत होणार आहे"