१ कप चहा आणि १ कॅपेचिनोसाठी कीकू शारदाने मोजली इतकी रक्कम, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:47 AM2019-09-05T00:47:49+5:302019-09-05T00:48:09+5:30

पंचतारांकित हॉटेलमध्ये २ केळ्यांसाठी अभिनेता राहुल बोसला ४४२ रुपये अदा करावे लागले होते. हे प्रकरण बरंच गाजलं आणि बराच काळ चर्चेत राहिलं.

Kiku Sharda had to pay 78 Thousand for one cup Tea & 1 Capechino... | १ कप चहा आणि १ कॅपेचिनोसाठी कीकू शारदाने मोजली इतकी रक्कम, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

१ कप चहा आणि १ कॅपेचिनोसाठी कीकू शारदाने मोजली इतकी रक्कम, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

googlenewsNext

प्रसिद्ध कॉमेडीयन कीकू शारदा सध्या बाली, इंडोनेशियात सुट्ट्यांचा आनंद घेतोय. सुट्ट्यांबाबतची अपडेट तो फोटोंच्या माध्यमातून शेअर करतो. खाण्यापिण्याचा शौकिन असलेला कीकू बालीच्या रेस्टॉरंटमधील डिशेसचा आनंद घेतोय. मात्र यावेळी कीकू शारदाला एक कप चहा आणि कॉफीसाठी मोजावी लागलेली रक्कम ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. कीकूने एक कप चहा आणि कॉफीसाठी ७६ हजार ६५० रुपये इतके पैसे मोजावे लागलेत. चक्रावून जाऊ नका, कारण यांत एक ट्विस्ट आहे. कीकू शारदाने जे ७६ हजार ६५० रुपये बिल दिलंय, त्याची भारतीय चलनानुसार किंमत आहे चारशे रुपये. 


कीकूने बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिलात एक कप चहासाठी ३० हजार आणि एका कॅपेचिनोसाठी ३५ हजार रुपये असे दोन्ही मिळून ७८ हजार ६५० रुपये दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. “एक कॅपेचिनो आणि एका चहासाठी ७८ हजार ६५० रुपये मोजावे लागलेत. मात्र माझी काहीही तक्रार नाही. कारण मी इंडोनेशिया, बालीमध्ये आहे. भारतीय चलनानुसार त्याची किंमत फक्त ४०० रुपये इतकी आहे. छोट्या मोठ्या खाण्यासाठी सेलिब्रिटींना मोठी रक्कम अदा करावी लागल्याचं याआधी समोर आलंय.

 
चंदीगडच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २ केळ्यांसाठी अभिनेता राहुल बोसला ४४२ रुपये अदा करावे लागले होते. हे प्रकरण बरंच गाजलं आणि बराच काळ चर्चेत राहिलं. कीकू शारदाला खाण्यापिण्यासह फिरण्याचाही शौक आहे. याआधी तो लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळालं. 

Web Title: Kiku Sharda had to pay 78 Thousand for one cup Tea & 1 Capechino...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.